'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा कार्यक्रम आणि तेथील कलाकार प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहेत. या कलाकारांच्या जीवनातील प्रत्येक गोष्ट प्रेक्षकांना जाणून घ्यायची असते. अशावेळी हास्यजत्रा फेम प्रथमेश शिवलकरने केलेली पोस्ट चर्चेत आहे. प्रथमेश शिवलकरने आई,बाबांसोबतचा खास फोटो पोस्ट केला आहे. यामध्ये त्यांच्या घरी एका नव्या फॅमिली मेंबर आगमन झाल्याचं दिसत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रथमेशने या पोस्टमध्ये आई-वडिलांच्या चेहऱ्यावरचा आनंद, समाधान आणि कौतुक किती महत्त्वाचं आहे ते देखील अधोरेखित केलं आहे. कारण मुलाची प्रगती होत असताना सगळ्यात जास्त आनंदी हे पालकच होतात. आपला मुलगा यशाची एक एक शिखरं पार करत असल्याचं समाधान पालकांच्या चेहऱ्यावर दिसत आहे. 


प्रथमेशची खास पोस्ट 



प्रथमेशने या पोस्टमध्ये आपली नवी कोरी महिंद्रा थारचा फोटो शेअर केला आहे. 'याचसाठी केला होता अट्टाहास भाग 1' अशी पोस्टची सुरुवात आहे. या पोस्टमध्ये त्याने आई-बाबा थारची चावी स्वीकारत असतानाचा फोटो शेअर केला आहे. या पोस्टमध्ये आणखी एक गोष्ट त्याने अधोरेखित केली आहे ती म्हणजे हा भाग 1 आहे आणि भाग 2 लवकरच... त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे. 


अभिनयासोबतच लेखक म्हणून प्रथमेश लोकप्रिय 



महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमात प्रथमेश वेगवेगळ्या भूमिका साकारताना दिसतो. हास्यवीर असलेला प्रथमेश शिवलकर फक्त अभिनेताच नाही तर लेखकाच्या भूमिकेत देखील आहे. प्रसाद खांडेकर दिग्दर्शित आगामी सिनेमात प्रथमेश लेखकाच्या भूमिकेत दिसणार आहे. महत्त्वाचं म्हणजे या सिनेमा स्वप्नील जोशी, प्राजक्ता माळी, प्रार्थना बेहेरे आणि हास्यजत्रेतील इतर कलाकार म्हणून भूमिका बजावतील. 


सईची कार 


काही दिवसांपूर्वी मराठी आणि हिंदी अभिनेत्री सई ताम्हणकरने गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर स्वत:साठी नवीन कार खरेदी केली आहे. सई ताम्हणकर आणि तिच्या कुटुंबीयांसाठी हा अतिशय खास क्षण होता. सईने एक नवीन मर्सिडीज बेंझ कार खरेदी केली आहे. ज्याची किंमत सुमारे दीड कोटी रुपये आहे. सई ताम्हणकरने आपल्या नवीन कार खरेदीचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करून आपल्या चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by Sai (@saietamhankar)


मराठी कलाकार सध्या घर आणि कार खरेदी करताना दिसतात. त्यांची ही प्रगती पाहून प्रेक्षकांनाच नक्कीच आनंद होत असेल. कारण आपल्या आवडत्या कलाकाराची प्रगती होताना पाहणे यासारखा आनंद नाही.