`आपल्याला उशिरा का होईना...` महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम विशाखा सुभेदारची `ती` पोस्ट चर्चेत
इन्स्टाग्रामवर नेहमीच विशाखा सुभेदार सक्रीय असते. सोशल मीडियावर विविध पोस्ट शेअर करताना ती कायम दिसते.
मुंबई : छोट्या पडद्यावरील 'महाराष्ट्राची हास्य जत्रा' हा लोकप्रिय मराठी कॉमेडी शो आहे. मराठी मालिकांबरोबरच प्रेक्षक त्यांच्या कुटुंबासोबत हा कॉमेडी शो आवर्जून पाहतात. या शोमधील प्रेत्येक कलाकाराने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. त्यात अभिनेत्री विशाखा सुभेदारनं (Vishakha Subhedar) प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. ती कायमच विविध कारणांमुळे चर्चेत असते. वि विशाखा सुभेदारने मराठी मालिका आणि चित्रपटांमध्ये आपला ठसा उमटवला आहे. एक उत्तम कॉमेडियन म्हणून तिला ओळखली जाते. नुकतीच तिने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्याची सोशल मीडियावर चर्चा आहे.
इन्स्टाग्रामवर नेहमीच विशाखा सुभेदार सक्रीय असते. सोशल मीडियावर विविध पोस्ट शेअर करताना ती कायम दिसते. नुकतंच विशाखा सुभेदारने इन्स्टाग्रामवर एक रिल शेअर केलं आहे. या रिलमध्ये ती 'जरुरत थे हम या जरूरी है तुमको' या गाण्यावर लिपसिंक करताना दिसत आहे. या व्हिडीओला तिने फारक सुंदर कॅप्शन दिलं आहे.
विशाखा सुभेदारची पोस्ट
''जरुरत, गरज ...किती खरी किती खोटी ? पण तोंडदेखल्या म्हणणं हे कळतच किं आपल्याला उशिरा का होईना..गरज सरो वैद्य मरो अशा च्या समवेत फार काळ राहू नये. आणि नंतर आपलं आपल्याला हसू येतं किं किती मूर्ख होतो आपण.. कोणाच्या बोलण्यावर आपण विश्वास ठेवला.''
विशाखा सुभेदारने या पोस्टमध्ये कोणाचाही उल्लेख केलेला नाही. त्यामुळे चाहते ही पोस्ट नेमकी कोणासाठी आहे याचा अंदाज लावता येत नाही. अनेकांनी विशाखाच्या या पोस्टवर कमेंट केल्या आहेत. अनेकांनी तिच्या या कॅप्शनचं कौतुकही केलं आहे.
'फु बाई फू' आणि 'कॉमेडीची बुलेट ट्रेन' या कॉमेडी शोमधून ती घराघरात पोहचली. विशाखा सुभेदारने आतापर्यंत 'फक्त लढ म्हणा' (२०११), '४ इडियट्स' (२०१२) आणि 'अरे आवाज कोनाचा' (२०१३) अशा काही चित्रपटांमध्ये काम केलं आहे. सध्या ती कुर्रर्र या नाटकात काम करत आहे.
महाराष्ट्राची हास्यजत्रा' या विनोदी कार्यक्रमातून अभिनेत्री विशाखा सुभेदार प्रेक्षकांना खळखळून हसवते. आपल्या दमदार कॉमेडी अंदाजाच्या जोरावर विशाखा अनेकांचे टेन्शन गायब करुन टाकते. याआधीही अनेक विनोदी कार्यक्रमांमधून विशाखाने विनोदी कलाकार म्हणून आपलं अभिनयकौशल्य दाखवलं आहे.