गौरव मोरेचा नवा हेअरकट; नेटकरी म्हणाले, ``याच्या केसाला कुणी धक्का लावला?``
Maharashtrachi Hasyajatra Gaurav More Haircut: महाराष्ट्राची हास्यजत्रा ही मालिका प्रचंड चर्चेत आहे त्यामुळे याची सर्वत्र चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. यावेळी गौरव मोरेच्या लुकनं सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.
Maharashtrachi Hasyajatra Gaurav More: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. 14 ऑगस्टपासून ही मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आल्यानं सर्वत्र आनंदोत्सव आहे. त्यामुळे या मालिकेची सर्वत्र चर्चा पाहायला मिळते आहे. यावेळी गौरव मोरेची जोरात चर्चा रंगलेली दिसते आहे. गौरव मोरे आणि समीर चौगुले एकत्र अनेकदा दिसतायत. यावेळी समीर चौगुले यानं सोशल मीडियावरून एक फोटो शेअर केला आहे. ज्यात गौरव मोरेचा लुक हा संपुर्ण बदलेला दिसतो आहे. त्याचे आधी केस हे थोडं वाढलेले होते आता त्यानं आपले वाढलेले केस कापले असून त्याचा लुक हा पुर्णपणे बदलेला दिसतोय. त्याचा हा बदलेला लुक पाहून नेटकरी आणि त्याचे चाहते वेगवेगळ्या कमेंट्स करताना दिसत आहेत. समीर चौघुले यांनी एक खास पोस्ट शेअर केली आहे.
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' ही मालिका काही दिवस प्रेक्षकांपासून दूर होती. त्याचबरोबर या मालिकेला सगळ्या कलाकारांनीही फार मीस केले होते. आता ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. यावेळी गौरव मोरेच्या लुकची चर्चा आहे. समीर चौगुले यांनी एक पोस्ट शेअर केली आहे ज्यात त्यांनी गौरव मोरेच्या या नव्या लुकचा फोटो शेअर केला आहे आणि कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की,'आमच्या हास्यजत्रेत नवीन अभिनेत्याचे पदार्पण' यापुढे त्यांनी #maharashtrachihasyajtra #newentry #debut असे हॅशटॅग्सही वापरले आहेत.
हेही वाचा : Scam 2003 मध्ये मराठी कलाकारांची रेलचेल; भरत जाधव, शशांक केतकरचा लुक पाहिलात?
यावेळी नेटकऱ्यांनी तूफान कमेंट्स केल्या आहेत. एकानं त्यांचा हा नवा हेअरकट पाहून कमेंट केली आहे की, ''पहिल्यांदा आम्ही गौरव मोरेचे कान पाहिले आहेत.'' तर दुसऱ्यानं लिहिलंय की, ''मस्त दिसतोय गौऱ्या'', तर तिसऱ्या एकानं लिहिलंय की, ''समीर चौघुले नी दिली आनंदाची बातमी त्यांच्याकडे झाले नव्या पाहुण्याचे आगमन मुखडा पाहून व्हाल थक्क'' अशा काही हटके कमेंट्स लिहिल्या आहेत. तर काहींनी लिहिलंय की, ''हा तर गरीबांचा शाहरूख खान वाटतोय'', तर दुसऱ्या एकानं लिहिलंय की, ''आता टानाना कसं करणार?''
काहींनी वेगवेगळ्या कमेंट्स दिल्या आहेत जसे की, ''गौरव ने केस कापले ....... गरुडपुरान मे इस्के लिये अलग सजा है .कोण होतास तू ?.? कसा झालास तू'', ''MHJ team असताना गौरवच्या केसाला धक्का कोणी लावला?'', तर काही समीर चौघूलेला ट्रोल केलं आहे. एक युझर म्हणाला की, ''दादा तुम्ही पण थोडे केस वाढवले तर बरं होईल'', अशा काही प्रतिक्रिया समोर आल्या आहेत.