Maherchi Saree 2 Alka Kubal:  1991 साली प्रदर्शित झालेला चित्रपट 'माहेरची साडी' (Maherchi Saree). या चित्रपटाची लोकप्रियता, क्रेझ अद्यापही कमी झालेली नाही. हा चित्रपट आजही अनेक लोकं आवडीनं पाहतात. महिलावर्गासाठी तर हा चित्रपट पुन्हा पाहणं एक पर्वणीचं असते. तेव्हा त्या काळी या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर (Maherchi Saree Box Office) आजच्या पेक्षाही जास्त पैसे कमावले होते असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही कारण त्याकाळी या चित्रपटानं अक्षरक्ष: इतिहास रचला होता ज्याचे साक्षीदार आजची पिढीही आहे. त्याकाळी गाजलेल्या या चित्रपटाचा तब्बल 32 वर्षांनी सिक्वेल येणार (Maherchi Saree Sequel) का याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून राहिले आहे. यावेळी या चित्रपटाच्या सिक्वेलबद्दल सुरू असलेल्या चर्चांना उधाण आलं असताना स्वत: अलका कुबल यांनी प्रतिक्रिया (Alka Kubal on Maherchi Saree 2) दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या काही वर्षांपासून अलका कुबल यांचा 'माहेरची साडी' हा गाजलेला चित्रपट पुन्हा नव्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आणि या चित्रपटात ज्याप्रमाणे माहेरची साडीमध्ये सूनेची भुमिका केली होती. त्याप्रमाणे या नव्या भागात अलका कुबल या सासूच्या भूमिकेतून दिसणार असल्याच्या चर्चांनी वेग धरला होता. 


काय म्हणाल्या अलका कुबल? 


अलका कुबल यांनी 'झी चित्र गौरव 2023' (Zee Chitra Gaurav 2023) या सोहळ्याला उपस्थिती लावली होती. यावेळी त्यांना माहेरची साडी 2 या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. ''माहेरची साडी 2 मध्ये अलका कुबल सुनेचा छळ करताना दिसणार आहेत, असं आम्हाला कळलंय, हे खरंय का?'' त्यावर त्या उत्तर देताना त्या म्हणाल्या, ''मी पण याबद्दल ऐकलंय पण मला याबाबत नक्कीच काही सांगता येणार नाही.''


'माहेरची साडी' (Maherchi Saree Cast) या चित्रपटात अलका कुबल यांच्यासह ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी, अंजिक्य देव, रमेश भाटकर, विजय चव्हाण, विक्रम गोखले यांच्या भुमिका होत्या. या चित्रपटाचे दिग्दर्शन विजय कोंडके यांनी केले होते. या चित्रपटानंतर अभिनेत्री अलका कुबल या लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचल्या होत्या. त्यांनी या चित्रपटातून साकारलेल्या सोशिक सूनची भुमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली त्यानंतर अनेकांच्या मनी अशीच इच्छा निर्माण झाली की सून हवी तर माहेरची साडीतल्या अलका कुबल यांच्यासारखीच. आजही ही जादू कायम आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


चित्रपटाची लोकप्रियता 


या चित्रपटाची लोकप्रियता आजही कायम आहे तेव्हा या चित्रपटाचा दुसरा भाग आलाच तर ती प्रेक्षकांसाठी एक नवी पर्वणी असेल. या भागाची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होती.