मुंबई : सडक, आशिकी, जख्म, हम है राही प्यार के सारखे सुपरहिट सिनेमे बनवणारे महेश भट्ट यांचा 70 वा वाढदिवस. दिग्दर्शनाबरोबरच महेश भट्ट प्रोडक्शन आणि स्क्रिप्ट रायटिंग देखील करतात. महेश भट्ट यांच संपू्र्ण जीवन हे अनेक विवादात अडकलं आहे. फक्त करिअरच नाही तर त्यांच खाजगी आयुष्य देखील विवादात अडकलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महेश भट्टच्या आयुष्याबद्दल खूप कमी लोकांना माहित आहे. महेश भट्ट यांचा जन्म आई-वडिलांच्या लग्नाअगोदरच झाला होता. त्याचा परिणाम खाजगी आयुष्यावर खूप झाला. यामुळेच बहुदा त्यांनी आपल्या खाजगी आयुष्यात देखील लग्नाला फार महत्व दिलं नाही. महेशची आई मु्स्लिम आणि वडिल हिंदू होते. ते कायमच आपल्या वडिलांपासून दूर राहिले आहेत. 


महेश भट्ट हे जेव्हा कॉलेजमध्ये होते तेव्हा ते लॉरिएन ब्राइट नावाच्या मुलीवर प्रेमात पडले त्यानंतर लॉरिएन यांच नाव बदलून किरण भट्ट ठेवण्यात आलं. किरण  या पूजा भट्ट आणि राहुल भट्टची आई आहे. याच दरम्यान त्यांच अफेअर परवीन बॉबीसोबत झालं. यामुळे त्यांच्या लग्नाच्या नात्यात खूप मोठी फूट पडली. मात्र कालांतराने परवीनच्या नात्यात दुरावा निर्माण झाला. असं म्हटलं जातं की, महेश भट्ट सोडून गेल्यामुळे परवीन आपलं मानसिक संतुलन बिघडून गेली. किरणच्या नात्यात जेव्हा दुरावा निर्माण झाला तेव्हा सोनी राजदान महेश भट्ट यांच्या आयुष्यात आली. आणि त्यांनी लग्न केलं. या लग्नानंतर महेश भट्ट यांनी मुस्लिम धर्म स्विकारला होता. सोनी या आलिया आणि शाहीन भट्ट यांची आई आहे. तसेच महेश भट्ट हे मुलगी पूजा भट्ट हिच्यामुळे देखील वादात ठरली आहे.


महेश भट्ट यांनी एका मॅगझीन करता मुलगी पूजा भट्टसोबत किस करताना फोटशूट केलं. महेश भट्टने असं देखील सांगितलं होतं की, जर पूजा माझी मुलगी नसती तर मी तिच्याशी लग्नच केलं असतं. वाद कितीही झाले तरीही महेश भट्ट कोणत्याही वादांना महत्व देत नाहीत.