Mahesh Bhatt on Raha Kapoor : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि त्याची पत्नी आलिया भट्ट यांची लेक राहा कपूर ही लोकप्रिय स्टारकिड्सपैकी एक आहे. काही दिवसांपूर्वीच रणबीरनं राहाचा चेहरा सगळ्यांना दाखवला होता. हे सगळं अचानक झालं. एकीकडे सगळेच सेलिब्रिटी त्यांचा मुलांचा चेहरा मीडिया किंवा पापाराझींच्या कॅमेऱ्यापासून लपवतात. दुसरीकडे आलिया आणि रणबीरनं त्यांच्या मुलीचा चेहरा सगळ्यांना दाखवला. या मागचं कारण महेश भट्ट यांनी सांगितला आहे. त्यांनी लेक आलिया आणि जावई रणबीर कपूरनं हा निर्णय का घेतला याविषयी खुलाला केला आहे.  


महेश भट्ट यांचा खुलासा


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


महेश भट्ट यांनी 'झूम' मुलाखती दरम्यान, एक गोष्ट सांगितली की 'जेव्हा रणबीर आणि आलियानं राहाचा चेहरा सगळ्यांना दाखवला, तेव्हा ते स्वत: आश्चर्यचकीत झाले होते. त्यासोबत ते विचार करत होते की त्या दोघांनी असा निर्णय का घेतला? त्यानंतर महेश भट्ट यांनी विचार केला की राहाच्या आई-वडिलांना जे योग्य वाटलं ते त्यांनी केलं. रणबीर आणि आलियानं या कारणामुळे घेतला की ती आता एक वर्षाची झाली आहे. तर आता तिचा चेहरा सगळ्यांना दाखवू शकतो.' 


पुढे महेश भट्ट म्हणाले 'हे देखील मान्य करणं गरजेचं आहे की मीडियाकडून खूप चांगली वागणूक मिळाली त्यांनी देखील या सगळ्यात मदत केली. राहाविषयी बोलताना ते म्हणाले ती मुळीच घाबरली नाही. महेश भट्टनं सांगितलं की जसे इतरं मुलं ही कॅमेऱ्यासमोर जाण्यासाठी घाबरतात, तशी राहा घाबरली नाही. मला असं वाटतं की तिच्याकडे हा एक गुण तिच्या आई-वडिलांकडून आला आहे.' 


हेही वाचा : अभिषेकपेक्षा लेक श्वेताच माझी ताकद; असं का म्हणाल्या जया बच्चन?


दरम्यान, गेल्या वर्षी आलियाला एका मुलाखतीत राहाचा चेहरा अजून दाखवला का नाही? यावर प्रश्न विचारताच तिनं यावर स्पष्ट उत्तर दिलं. आलिया म्हणाली 'मी माझ्या मुलीला लपवते असं वाटायला नको. मला माझ्या लेकीवर खूप गर्व आहे. जर आता कॅमेरे नसते तर मी तिचा एक मोठा फोटो स्क्रीनवर दाखवला असता. माझं तिच्यावर खूप प्रेम आहे. मला आमच्या बाळावर गर्व आहे. मात्र, आम्ही आताच्या काळातील मुलं आहोत, तर आम्हाला नाही माहित इंटरनेट तिचे फोटो येतील तेव्हा आम्हाला कसं वाटेल. ती आता फक्त एक वर्षाची आहे.'