Mahesh Bhatt : बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक म्हणून आज महेश भट्ट (Mahesh Bhatt) यांची ओळख आहे. महेश भट्ट त्यांच्या कामामुळे नाही तर, अनेकदा वादग्रस्त मुद्द्यांमुळे चर्चेत असते.  महेश भट्ट यांचं नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडण्यात आलं. चित्रपटांव्यतिरिक्त अनेक वादही त्यांच्या आयुष्याशी संबंधित आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बॉलीवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक महेश भट्ट अरबाज खानच्या शो द इनव्हिसिबल्समध्ये पोहोचले होते. यादरम्यान त्यांनी आपल्या आयुष्याशी संबंधित अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. या मुलाखतीत महेश भट्ट यांनी दारूचं व्यसन ते दारूपासून मुक्ती कशी मिळवली यासारख्या विषयांवर चर्चा केली. महेश भट्ट यांनी सांगितलं की, काही वर्षांपूर्वी त्यांना दारूचं व्यसन लागलं होतं. यामुळे अनेकवेळा त्यांना पत्नी सोनी राझदानकडून फटकारलं गेलं.


शाहीनमुळे दारू सोडली
महेश भट्ट दारूचे व्यसन होते, मग त्यांनी दारू सोडली कशी? यावर थेट संवाद साधताना ते म्हणाले, ''यश आणि प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचल्यानंतरही मला शून्यतेची जाणीव झाली आणि मला दारूच व्यसन लागले. पण एके दिवशी माझी दुसरी मुलगी शाहीनचा जन्म झाला तेव्हा मी दारू पिऊन घरी परतलो. मला आठवते मी माझ्या मुलीला माझ्या हातात घेतलं आणि मी तिला किस करायला जाणार इतक्यात ती, मागे वळली कारण माझ्या तोंडाला वास येत होता. आणि त्या एका क्षणाने माझं आयुष्य बदलून टाकलं. तेव्हापासून 34 वर्षे झाली, मी दारू प्यायलो नाही, असे महेश भट्ट यांनी सांगितलं.'' 



महेश भट्ट फूटपाथवर झोपलेले
एवढंच नव्हेतर महेश भट्ट यांनी दारूच्या नशेत फुटपाथवर पडलेल्या प्रसंगाची आठवण करून दिली यावेळी त्यांना भानही नव्हतं. या प्रसंगाविषयी बोलताना त्यांनी सांगितलं की, "एक दिवस जेव्हा मी माझे डोळे उघडले तेव्हा मला JVPD योजनेच्या फूटपाथवर झोपलेलो दिसलो. मला आठवतं की, पहाटेची वेळ होती आणि मी तिथे पडलो होतो. मला जेव्हा हे समजलं  तेव्हा, मी कोणत्यातरी पार्टीला गेलो होतो आणि मग तिथेच पडलो.