मुंबई : ब्रेकपॉईंट, एक अशी सीरीज आहे, जी  देशातील सगळ्यात मोठ्या टेनिस हीरो लिएंडर पेस आणि महेश भूपति यांच्या पब्लिक स्प्लिटबाबतच्या सगळ्या तर्कवितर्कांना पूर्णविराम लावेल, ज्याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही जोडी 1990 च्या दशकातील सर्वात खतरनाक जोडगोळी राहिली असून 1999 मध्ये जगातील सर्वोच्च स्थानावर राहिली होती. मात्र, हे त्यांच्या कडवट ब्रेकअपवर देखील प्रकाश टाकतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, ही दोन मित्रांची कहाणी आहे ज्यांनी, यशस्वीतेची योजना बनवली होती मात्र  यशस्वीतेनंतरच्या आयुष्याची नाही. या दोन पोस्टर्समध्ये लिएंडर आणि महेश यांना दाखवण्यात आलं असून त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.



लिएंडर पेस आणि महेश भूपति यांच्या ब्रोमॅन्सपासून  ब्रेकअप पर्यंतच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे झी5 च्या आगामी वेब-सीरीजमध्ये मिळणार आहेत. ही देशातील या दोन  खेळाडूंच्या मैत्री, बंधुता, भागीदारी, विश्वास, कठोर मेहनत आणि महत्वाकांक्षेवर आधारित आहे. झी5 सोबतच्या आपल्या पहिल्या भागीदारीमध्ये, फिल्म निर्माता अश्विनी अय्यर तिवारी आणि नितेश तिवारी यांचा बॅनर अर्थस्काय पिक्चर्सद्वारे  'ब्रेकपॉइंट' सादर करण्यात येत आहे. सात भागांची ही सिरिज लवकरच झी 5वर उपलब्ध होणार आहे.