मुंबई : धमाकेदार आणि उत्कृष्ट परफॉर्मन्स सादर करून झी युवावरील डान्स महाराष्ट्र डान्स या कार्यक्रमाने लोकप्रियतेचे शिखर गाठले आहे. कार्यक्रमातील एकसे बढकर एक स्पर्धकांमुळे ही स्पर्धा दिवसेंदिवस जास्तच अवघड होत चालली आहे. स्पर्धकांना प्रोत्साहन देणे आणि त्यांच्याकडून नेहमीच उत्तमोत्तम परफॉर्म करून घेण्याची जबाबदारी या कार्यक्रमाचे चे तीन परीक्षक म्हणजेच सिद्धार्थ जाधव, फुलवा खामकर आणि  आदित्य सरपोतदार चोख पार पाडत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या कार्यक्रमात नेहमीच प्रेक्षकांना काहीतरी नवीन पाहायला आणि अनुभवायला मिळते. या आठवड्यात डान्स महाराष्ट्र डान्स मधील सर्व स्पर्धक मराठी चित्रपटाच्या सुवर्णकाळाला उजाळा देणार आहेत आणि या खास प्रसंगाचे साक्षीदारदेखील तितकेच खास असणार आहेत. डान्स महाराष्ट्र डान्सच्या मंच जेष्ठ अभिनेता दिग्दर्शक महेश कोठारे यांच्या उपस्थितीने धन्य होणार आहे.


या स्पर्धेतील आघाडीवर असलेला 'फील ग्रुप' यावेळी मराठी सिनेसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांची आयुष्य गाथा त्यांच्या परफॉर्मन्सद्वारे सादर करणार आहेत. तर दुसरीकडे ‘ओम डान्स ग्रुप’ सदाबहार लावणी सादर करणार आहेत. हास्यसम्राट लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या गाण्यावर ‘गॅंग १३’ थिरकणार आहे. तसेच माधुरी दीक्षित, दादा कोंडके, अशोक सराफ यांच्या गाण्यावर स्पर्धक ठेका धरणार आहेत. 


तर मग हे अफलातून डान्स परफॉर्मन्स पाहायला विसरू नका डान्स महाराष्ट्र डान्स, बुधवार ते शुक्रवार रात्री ९.३० वाजता फक्त झी युवा वर