`आपल्या कोशातून बाहेर पड`, महेश मांजरेकरांचा शाहरूख खानला सल्ला
महेश मांजरेकर शाहरूखवर भडकले, म्हणाले...
मुंबई : दिग्दर्शक, अभिनेता महेश मांजेरकर कायमच आपल्या स्पष्टवक्तेपणामुळे चर्चेत असतात. मराठी सिनेसृष्टीत तसेच बॉलिवूडमध्ये महेश मांजरेकरांना वेगळा सन्मान आहे. यामुळे त्यांनी एका कलाकाराबद्दल केलेलं भाष्य चर्चेचा विषय ठरतो. सध्या आपल्या मुलाच्या ड्रग्स प्रकरणामुळे अभिनेता शाहरूख खान चर्चेत आहे. याच शाहरूख खानला महेश मांजरेकरांनी सल्ला दिला आहे.
आपल्या गुणांना शाहरूख वाव देत नाही - मांजरेकर
महेश मांजरेकर यांचं म्हणणं आहे की, बॉलिवूडचा बादशाह शाहरूख खान आपल्या गुणांना वाव देत नाही. तो आता काही नवीन करताना दिसत नाही. त्याला स्वतःला आपल्या कोशातून बाहेर पडावं लागेल. महेश मांजरेकर म्हणाले की,'शाहरूखकडे त्या सगळ्या गोष्टी आहेत ज्या एका उत्तम कलाकाराकडे असायला हव्यात. मात्र तो स्वतःच्याच कोशात अडकला आहे. त्याला काही तरी वेगळं करण्याची गरज आहे.'
तो एक असा अभिनेता आहे ज्याने आपल्या प्रतिभेला न्याय दिला नाही. तो शाहरुख खान आहे, समस्या अशी आहे की, त्याला त्याच्या कोशातून बाहेर यायचे नाही. त्याला फक्त माझे हे चित्र चालेल या विश्वासाने जगायचे आहे, मी एक प्रेमी मुलगा आहे. त्यांना या कवचातून बाहेर यावे लागेल. 'माझा फक्त सिनेमा चालावा. मी एक लवरबॉय आहे. त्याला आपल्या या कोशातून बाहेर यावं लागेल', असं देखील मांजेरकर म्हणाले.
शाहरूख शानदार अभिनेता
महेश मांजरेकर म्हणाले की, आजकाल रणवीर सिंग आणि रणवीर कपूर जी व्यक्तिरेखा साकारत आहेत, तीच भूमिका शाहरुख करत आहे, मग लोक शाहरुख खान का पाहतील? लोकांना त्या पात्रांमध्ये शाहरुख पाहायचा आहे आणि या व्यक्तिरेखा फक्त शाहरुखसाठी बनवण्यात आले आहे असे म्हणायचे आहे. मला स्वतःला वाटते की शाहरुख खानने बनवलेल्या कोशातून बाहेर पडावे, तरच तो काहीतरी चांगले करू शकेल. तो एक उत्कृष्ट अभिनेता आहे.