`त्यांना 12 तास आणि मला शेवटचा अर्धा तास....` करीनासोबत काम करणारी मराठी अभिनेत्री असं का म्हणाली?
Marathi Actress on Crew Shooting : मराठी अभिनेत्रीनं क्रु चित्रपटाच्या निर्मात्यांवर केला गंभीर आरोप... म्हणाली स्क्रिप्ट नाही अन् 12 तासाचं शूट 30 मिनिटात... लीड कलाकरांसोबत काम करण्याविषयी अभिनेत्रीचा खुलासा
Trupti Khamkar on Crew Shooting : बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर, तब्बू आणि क्रिती सेननचा 'क्रू' या चित्रपटाला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटात भूमिका साकारणारी मराठी अभिनेत्री क्रिती खामकरनं निर्मात्यांवर 12 तासाचं शूट 30 मिनिटात करुन घेण्याचा आरोप केला आहे. त्यासोबत तिनं हे देखील सांगितलं आहे की तृप्ती खामकरनं हे देखील सांगितलं की सेटवर तिचं काम तेव्हाच सुरु होईल जेव्हा करीना, तब्बू आणि क्रिती सेनन जातील. तोपर्यंत दिवसभर ती उभं राहुन तिचे डायलॉग्स पाठ करत होती.
तृप्ती खामकरनं ही मुलाखत 'झूम'ला दिली आहे. यावेळी तिनं क्रू चित्रपटाच्या निर्मात्यांकडून मिळालेल्या वागणूकीविषयी सांगितलं आहे. तृप्ती खामकरनं सांगितलं की निर्मात्यांनी तिला कधीच चित्रपटाच्या मुख्य भूमिका असलेल्या कलाकारांसोबत काम करण्याची संधी दिली नाही. इतकंच नाही तर तिला प्रॉपर जी गरज आहे तशी योग्य स्क्रिप्ट देखील दिली नव्हती.
तृप्ती खामकरनं सांगितलं की "जेव्हा तुम्ही कोणत्याही स्टार कास्टसोबत काम करतात, तेव्हा ही सर्वसामान्य गोष्ट आहे की अगोदर त्यांचं काम होईल आणि ते घरी जातील. त्यानंतर तुमचं शूट सुरु होईल. अनेकदा तर असं व्हायचं की 12 तासाच्या शिफ्टमध्ये संपूर्ण कॅमेरे हे त्यांच्यावरच फोक्स्ड असायचे. मी फक्त तिथे उभी राहून माझे डायलॉग्स पाठ करायची आणि जेव्हा करीना, तब्बू आणि क्रिती सेनन घरी जायच्या आणि शेवटचा अर्धा तास शिल्लक रहायचा तेव्हा मला म्हटलं जायचं की तृप्ति, आज दिवसभरात चित्रपटासाठी जितकं काम झालं आहे. त्याला अर्ध्या तासात कर. मी म्हणायचे ठीक आहे होऊन जाईल आणि मी अर्ध्या तासात सगळ्या लाइन बोलून दाखवायचे."
12 तासाचं काम 30 मिनिटात करायची
तृप्ति खामकरप्रमाणे, तिला या गोष्टीचं वाईट वाटलं की तिचं काम हे 12 तासाचं होतं, पण तिच्याकडून अर्ध्या तासात ते काम करुन घ्यायचे. इतकंच नाही तर तिला योग्य अशी स्क्रिप्टही दिली नाही. तिला सेटवर संपूर्ण दिवस अलर्ट रहावं लागायचं आणि लक्ष द्यावं लागायचं की कोणते सीन शूट करण्यात आले आहेत, जेणेकरुन ती तिच्या सीन्ससाठी तयार राहिल. ती लीड स्टारकास्टसोबत थांबून लाइन्स तर लक्षात ठेवायची पण त्यांच्यासोबत परफॉर्म करण्याची संधी देण्यात आली नाही.
हेही वाचा : इफ्तार पार्टीसाठी बोलावून मुनव्वर फारुकीवर केला हल्ला? रेस्टॉरंटचा मालक आणि स्टाफनं मारली अंडी
आता कोणत्याही सेटवर काम करु शकते...
तृप्ती खामकरनं पुढे सांगितलं की मला वाटतं की "ही खूप चांगली प्रक्रिया होती. माझ्याकडे थिएटरमध्ये मास्टर्स डिग्री आहे, पण त्यानं तुम्हाला कोणतीही मदत होत नाही. सेटवर तुम्हाला जी ट्रेनिंग मिळते, ती वेगळीच असते. तुम्हाला संपूर्ण दिवस त्यावर लक्ष ठेवावं लागतं की तुम्ही कोणत्या सीनमध्ये आहात. लोकं तुम्हाला डायलॉग्स देणार नाही. तुम्हाला हे पाहाचं असतं की इतरांनी त्यांचे डायलॉग्स कसे दिले आहेत. मग त्यानंतर ठरवायच असतं की तुम्ही त्यांना कोणत्या पद्धतीनं उत्तर द्याल. 'क्रू' नंतर मला आता असं वाटतंय की मी कोणत्याी चॅलेन्जिंग सेटवर आता काम करु शकते, कारण मला या चित्रपटाच्या माध्यमातून ट्रेनिंग मिळाली आहे."