मुंबई : अभिनेत्री मलायका अरोरा आणि अभिनेता अर्जुन कपूर यांची जोडी कायम चर्चेत असते. जवळपास गेल्या 3 वर्षांपासून ते रिलेशनशीपमध्ये आहेत. दोघांनीही त्यांच्या प्रेमाची कबूली देखील दिली आहे. 2019 साली दोघांनी त्यांच्या नात्याला दुजोरा दिला. तेव्हापासून सोशल मीडियावर त्यांना नेटकरी ट्रोल करत असतात. मीडिया रिपोर्ट नुसार 'मलायका 'बुड्ढी' तर Arjun Kapoor फार Desperate' असं म्हटलं जातं. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावर मलायाकाने उत्तर दिलं आहे. ती म्हणते, 'प्रेमाला कसलचं बंधन नसतं. वयाचंही नाही... आपला समाज वेळेनुसार पुढे जातचं नाही. अधिक वयाचा पुरूष त्याच्यापेक्षा लहान वयाच्या मुलीसोबत रोमांस करू शकतो. पण महिला जास्त वयाच्या पुरूषासोबत राहू शकतं नाही. अशा लोकांसाठी महिला म्हातारी तर पुरूष डेस्परेट असतो. '


सेलिब्रिटींच्या गर्दीत प्रकाशझोतात असणारी एक जोडी म्हणजे, अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा. प्रेमाच्या नात्याला वयाचं किंवा इतर कोणत्याही गोष्टीचं बंधन नसतं हेच या दोघांनी सिद्ध केलं आहे. मुख्य म्हणजे आता सोशल मीडियाच्या माध्यमातूनही ही जोडी त्यांच्या प्रेमाची 'खुल्लम खुल्ला' ग्वाही देतात.