मालायका आणि अर्जुननं होळीचं कसं केलं सेलिब्रेशन, शेअर केला फोटो
दोघांचा खास अंदाज
मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा डोकं वर करत आहेत. अशावेळी मुंबईत महानगरपालिकेने रंगपंचमी, होळीच्या पार्टीला परवानगी नाकारली आहे. नागरिकांना घरातच सुरक्षित राहण्याचे आदेश दिले आहेत. घरातच कुटुंबियांसोबत होळी साजरी करण्याचे आवाहन केले आहे. अशावेळी अभिनेत्री मलायका अरोरा आणि अभिनेता अर्जुन कपूर वेगळ्याच रंगात रंगले आहेत. या दोघांनी अनोख्या पद्धतीने सण साजरा केला आहे.
होळीच्या या निमित्ताने खूप मोठा विकेंड आला आहे. शनिवार रविवारसोबतच रंगपंचमी सोमवारी आल्यामुळे मोठा विकेंड मिळाला आहे. रविवारी संध्याकाळी अर्जून कपूरने आपल्या इंस्टाग्रामवर मलायकाचा एक फोटो पोस्ट केला आहे. ज्यामध्ये ती चालताना दिसत आहे. सोमवारी सकाळी मलायकाने अर्जुनचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये तो स्विमिंग पूलच्या शेजारी स्किपिंग करताना दिसत आहे.
मलायका आणि अर्जुन एकत्र दिसत आहेत. अरबाज खानसोबत घटस्फोट घेतल्यानंतर मलायका कायमच अर्जूनसोबत दिसते. असं असलं तरीही मलायका आणि अरबाजचे चांगले संबंध आहेत.
अभिनेत्री मलायका अरोरा चित्रपटांपेक्षा तिच्या फिटनेमुळे चर्चेत असते. मलायकाच्या फोटोंचे चाहते दिवाने आहेत. मलायकाच्या फिटनेसचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. मलायकाच्या डान्सचीही चर्चा सोशल मीडियावर होत असते. नुकतीच मलायकाने चाहत्यांसाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे आणि गंमतीशीर गोष्ट सांगितली आहे. मलायकाने चाहत्यांसाठी इन्स्टाग्रामवर मजेदार किस्सा शेअर केला आहे.
कोरोनाची लस घेवून घरी आलेल्या कुटुंबीयांना ती काय बोलते हे मलायकाने सांगितले आहे. नुकताच मलायकाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर लिहिले आहे की, ''जेव्हा यापूर्वी माझ्या घरी पाहुणे यायचे तेव्हा ती नेहमी म्हणायचे, "घाबरू नको, मी माझ्या कुत्र्यांना लस दिली आहे." आता मी कुत्र्यांना सांगते, घाबरू नका, आम्ही लस घेतली आहे.