मुंबई : 'इंडियाज बेस्ट डान्सर 2'  डान्स रिअॅलिटी शो सुरू झाला आहे. शोच्या दुसऱ्या भागातील स्पर्धकांचे एकापेक्षा एक परफॉर्मेंस पाहिल्यानंतर यावेळी 'काटे की टक्कर'असेलचं असं म्हणायला काही हरकत नाही. सध्या शोचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. प्रोमो पाहून प्रेक्षकांच्या मनात शोबद्दल उत्सुकता आहे. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक स्पर्धक काही असं म्हणाल्य ज्यामुळे दोघी लाजून लाल झाल्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हिडिओमध्ये पाहिल्यानंतर असं दिसतं की, स्पर्धक मलायकाला पाहिल्यानंतर फार आनंदी झाला आणि म्हाणाला, 'तुम्ही पूर्वीपेक्षा फार सुंदर दिसत आहात.. आधी तुम्ही पातळ होता...' स्पर्धकाचं मत ऐकून मलायका लाजली आणि हैराण झाली. त्यानंतर तो मोबाईलवर व्हिडिओ चालू करत म्हणाला, 'याठिकाणी मी छय्या छय्या करायला आलो आणि येथे मला छय्या छय्याला पाहून असं वाटलं की मी स्वप्न पाहात आहे...'


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


मलायका कायम कोणत्यातरी कारणामुळे चर्चेत असते. कधी तिच्या सौंदर्यामुळे तर कधी अर्जुन कपूरसोबत असलेल्या रिलेशनशिपमुळे चर्चेत असते. एवढंच नाही तर दोघांनी प्रेमाची कबुली देखील दिली आहे. अर्जुन आणि मलायका यांच्यात असलेल्या वयाच्या अंतरामुळे त्यांना कायम ट्रोलिंगचा सामना करावा लगातो.