मुंबई : मलायका अरोरा ही एक उत्तम अभिनेत्रीच नाही तर ती एक उत्तम डान्सरही आहे एवढचं नव्हेतर ती एक वीजे आणि टेलीविजन प्रेजेंटर देखील आहे. मलायका अरोरा आजही तिच्या आयटम साँगसाठी ओळखली जाते. मलायका अरोराला 1998 मध्ये आलेल्या 'दिल से' चित्रपटातील 'छैय्या छैय्या' या गाण्याने खरी ओळख मिळाली. या गाण्याने अभिनेत्रीने इंडस्ट्रीत खळबळ उडवून दिली. आपल्या लूक आणि फॅशन सेन्सने आज खळबळ माजवलेल्या मलायका अरोराला अभिनयाच्या जगात कधीच प्रवेश करायचा नव्हता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या अभिनेत्रीला लहानपणापासूनच शिक्षिका बनण्याची इच्छा होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिनयाच्या दुनियेत प्रवेश केल्यानंतर अभिनेत्रीने अभिनेता आणि निर्माता अरबाज खान यांची भेट झाली. मलायका अरोरा आणि अरबाज खान एका जाहिरातीच्या शूटिंगच्या सेटवर एकमेकांच्या प्रेमात पडले.अनेक वर्षे डेटिंग केल्यानंतर मलायका अरोरा आणि अरबाज खान यांनी 1998 मध्ये लग्न केलं. जवळजवळ 18 वर्षे वैवाहिक जीवन जगल्यानंतर, हे जोडपं 2017 मध्ये वेगळं झालं. 2017 मध्ये अरबाज खानपासून वेगळं झाल्यानंतर, मलायका अरोरा अभिनेता अर्जुन कपूरला डेट करत आहे. हे कपल अनेकदा सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे लव्ही-डबी फोटो शेअर करत असतात. जेव्हा १९९८ साली मलायकाने छैय्या-छैय्या हे आयटम साँग केलं तेव्हा अर्जून कपुर १३ वर्षांचा होता.


मलायकाचं नाव बॉलिवूडच्या टॉप आयटम गर्ल्समध्ये घेतलं जातं.
मलायका अरोराला खरी ओळख मिळाली ती म्हणजे तिच्या डान्स टॅलेंटमुळेच. 'छैया-छैया', 'मुन्नी बदनाम हुई' सारख्या अनेक गाण्यांवर परफॉर्म करून लोकांमध्ये ओळख मिळवणारी ती तिच्या काळातील टॉप आयटम गर्ल्सपैकी एक होती.


चित्रपटांमध्ये येण्याआधी मलायका अरोरा जाहिरातींमध्ये काम करायची आणि अशाच एका जाहिरातीच्या शूटिंगदरम्यान तिची भेट अरबाज खानशी झाली. या जाहिरातीच्या शूटिंगदरम्यान दोघेही प्रेमात पडले आणि जवळपास पाच वर्षे डेटिंग केल्यानंतर मलायका आणि अरबाजने 1998 साली लग्न केले. दोघांनाही एक मुलगा आहे.  


23 ऑक्टोबर 1973 रोजी मुंबईत जन्मलेली मलायका अरोरा तिच्या फॅशनद्वारे बॉलिवूडच्या जगावर अधिराज्य गाजवते. मलायका अरोरा फॅशनच्या बाबतीत भल्या-भल्यांना मागे सोडते. मलायका जितकी ग्लॅमरस आणि फॅशनेबल आहे, तितकीच बालपणात मलायका स्टाईलच्या बाबतीतही तितकीच साधी होती. खरं तर, काही रिपोर्ट्समध्ये मलायकाच्या बालपणाबद्दल असा दावा करण्यात आला आहे की ती अगदी मुलांप्रमाणे रहायची. इतकंच नाही तर आज मलायका लाखो दिलों की धडकन आहे.