वयाच्या 25 व्या वर्षी लग्न, त्यानंतर आलेल्या जाबाबदाऱ्या... मलायका अन्य महिलांना काय सांगते?
लग्न झाल्यानंतर अन्य महिलांना काय सांगते मलायका?
मुंबई : अभिनेत्री मलायका अरोरा बॉलिवूडमधील यशस्वी अभिनेत्रींपैकी एक आहे. मलायका कायम कोणत्या तरी गोष्टीवरून चर्चेत असते. कधी सोशल मीडिया तर कधी अभिनेता अर्जुन कपूरसोबत असलेल्या नात्यामुळे मलायका चर्चेचा विषय असते. आता देखील मलायका चर्चेत आली आहे. पण आता कारण वेगळं आहे. लहान वयात लग्न, मुलं आणि करिअर सांभाळणारी मलायका देशातील आणि जगातील अनेक महिलांसाठी प्रेरणास्थान आहे.
फार कमी लोकांना माहिती आहे की, मलायकाने वयाच्या 25 व्या वर्षी अभिनेता अरबाज खानसोबत लग्न केलं. त्यानंतर तिने मुलाला जन्म दिला. पण तिने कधी तिच्या करियरकडे दुर्लक्ष केलं नाही. या गोष्टीचा खुलासा मलायकाने एका मुलाखतीत केला आहे.
मलायका म्हणाली, 'लग्नानंतर जेव्हा आई होण्याचा निर्णय घेतला, तेव्हा त्याचा माझ्या प्रोफेशनल आयुष्यावर कोणताही बदल झाला नाही. अन्य महिलांसाठी हे उदाहरण आहे. आशावेळी लोक अनेक चर्चा करतात. पण या सर्व गोष्टींचा माझ्यावर काही परिणाम झाला नाही...'
ती पुढे म्हणाली, 'पण आता सर्व काही बदलंल आहे. आज महिला लग्नानंतर आणि आई झाल्यानंतर देखील काम करू शकतात... काही वर्षांपूर्वी कठीण होतं.. पण आता वेळ बदलली आहे...'
'महिला आता प्रेग्नेसी दरम्यान देखील काम करतात. एवढंच नाही तर आई झाल्यानंतर देखील करियरला प्राधन्य देतात. मी देखील प्रेग्नेसी दरम्यान काम केलं. प्रवास केला फिरले....' असं देखील मलायका म्हणाली...