मुंबई : 49 वर्षांची मलायका अरोरा (Malaika Arora) चर्चेत येण्यासाठी एकही कारण सोडत नाही. मलायका तिच्या प्रत्येक पोस्टनंतर (Malaika Arora Photos) चर्चेत असते. वयाच्या 49 वर्षीही  (Malaika Arora Age) मलायका आजही खूप फिट आहे. तिच्या फिगरवर लाखो चाहते फिदा आहेत. आजही ती बॉलिवूडच्या भल्या-भल्या अभिनेत्रींना टक्कर देते. तिची परफेक्ट फिगर चाहत्यांना घायाळ करत असते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या काही वर्षांपासून मलायका अरोरा (Malaika Arora) ही अर्जुन कपूर याला डेट करत आहे. अनेकदा हे दोघेसोबतच स्पाॅट होतात. अर्जुन कपूर याला डेट करत असल्याने अनेकदा मलायका अरोरा ही नेटकऱ्यांच्या निशाण्यावर देखील येते. अनेकदा मलायका अरोरा जिमच्याबाहेर  स्पॉट होते.  


सोशल मीडियावर मलायका सक्रिय असते. कायम अभिनेत्री तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकतेच मलायकाने काही फोटो सोशल मीडियावर (Malaika Arora Instagram) शेअर केले आहेत. तिच्या या फोटोंचा सध्या सोशल मीडियावर बोलबाला आहे. या फोटोंमध्ये मलायका साडीमध्ये दिसत आहे. तिचा हा लूक पाहून चाहते तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. तिच्या या फोटोत तिने साडीमध्ये किलर पोज दिल्या आहेत. 


या फोटोत आपण पाहू शकतो कि, मलाकाने तिचा पदर हातावर घेतला आहे. ज्यामुळे तिची परफेक्ट फिगर दिसत आहे. व्हायरल होणाऱ्या या फोटोत मलायकाने (Malaika Arora Pics) ऑफ व्हाईट कलरची सेल्फ एंब्रॉडरी साडी परिधान केली आहे. न्यूड मेकअपसह तिने तिच्या केसांचा बन बांधला आहे. तिची स्टाईलिस्ट हेअरस्टाईलमुळे तिचं सौंदर्य अजून खुलून दिसत आहे. ऑफ व्हाईट साडीला मॅचिंग असा ब्लाऊज तिने घातला आहे. या फोटोत मलायकाचा पदर तिने खाली पाडला आहे.



 मलायका अरोरा बॉलिवूड सिनेमासोबतच आइटम साँगमध्ये काम करताना दिसते. याचबरोबर ती आयटम साँन्ग करुन चाहत्यांचं मनोरंजन करताना दिसते. 'छैया-छैया' ते 'मुन्नी बदनाम' पर्यंत बऱ्याच सुपरहिट आयटम साँन्ग तिने केले आहेत. मलायका आपल्या पर्सनल लाईफसोबतच तिच्या प्रोफेशनल लाईफमुळे चर्चेत असते. अर्जून कपूरसोतच्या रिलेशनशिपमुळेही ती कायम चर्चेत असते. कायम ती अर्जूनसोबत वेकेशनवर जाताना दिसते. हे कपल कधी लग्नबंधनात अडकणार आहेत याची चाहत्यांना उत्सुकता आहे.