मुंबई : बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री मलायका अरोरा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. कोणताही तिचा व्हिडिओ असो तो सोशल मीडियावर व्हायरल होतोच. कधी तिचे फिटनेस व्हिडिओ तर कधी तिच्या डान्सचे व्हिडिओ व्हायरल होतात. त्याचबरोबर तिला तिच्या खास स्टाईलसाठी सोशल मीडियावर ओळखलं जातं. अलीकडेच तिने स्वतःचा एक व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर केला आहे. मलायका टाळी वाजवताच तिचा मेकअप करते आणि कपडेही बदलते. हे या व्हिडिओमध्ये पाहिलं जाऊ शकतं. मलायकाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मलायका अरोराने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. तिच्या या व्हिडिओबद्दल बोलत असताना, प्रथम ती मेकअपशिवाय दिसतेय आणि नंतर टाळी वाजताच ती पूर्णपणे तयार दिसते. जर आपण तिचा लूक बघितला तर तिने हिरव्या रंगाचा ड्रेस घातला आहे आणि तिच्या चेहऱ्यावर मस्त सिंपल मेकअप आहे. यासोबतच, तिच्या एका चाहत्याने 'तुम्ही बुलेट ट्रेनपेक्षा वेगवान आहात' अशी कमेंटमध्ये लिहिलं आहे, तर कोणीतरी 'खूप हुशार' अशी कमेंट केली आहे.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


मलायका अरोराने आयटम साँगने बॉलिवूडमध्ये जबरदस्त ओळख निर्माण केली आहे. तिने 'छैय्या छैय्या', 'अनारकली' आणि 'मुन्नी बदनाम' सारख्या सुपरहिट गाण्यांनी लोकांच्या हृदयात स्थान निर्माण केलं आहे. यासोबतच तिच्या डान्सचे व्हिडिओही सोशल मीडियावर दिसत आहेत. तसंच, मलायका हिने इंडियाज गॉट टॅलेंट आणि इंडियाज बेस्ट डान्सर सारखे शो जज केले आहेत.