मुंबई : मलायका अरोरा नेहमीच तिच्या फिटनेस आणि बॉयफ्रेंड अर्जून कपूरमुळे चर्चेत असते. मलायकाने अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तसेच तिने अनेक आयटम साँग्स देखील केली आहेत, जे खूपच हिट ठरले. मलायका नेहमीच आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर काहीना काही शेअर करत असते आणि आपल्या चाहत्यांसोबत ती कनेक्ट राहाते. चाहाते देखील मलाईकावर भरभरुन प्रेम करतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या मलायका चर्चेत आली ती आपल्या फोटोशूटमुळे. या फोटोशूटमध्ये मलायका अरोराने पर्पल कलरचा असा ड्रेस परिधान केला आहे की, तिने नक्की काय घातलं आहे आणि स्टाईल कोणती आहे. हे लोकांना समजनं कठीण झालं आहे. ज्यामुळे ती ट्रोल देखील होत आहे.


मलायका या ड्रेसमध्ये अभिनेत्री जमिनीवर बसून, तसेच झोपून पोज देताना दिसत आहे. विशेष म्हणजे हे फोटो पाहूण मलायकाची स्टाईल लोकांना विचार करायला भाग पडत आहे.



मलायका खरंतर तिच्या स्टाईल आणि ड्रेसमुळे ओळखली जाते. तसेच तिने इंडियास नेक्स टॉप मॉडल या शोला जज देखील केलं आहे. असे असून देखील तिचा ड्रेसिंग सेन्स इतका खराब कसा? असा अनेकांना प्रश्न पडला आहे.



मलायका ट्रोल होण्याची ही पहिलीच वेळ नाही, यापूर्वी ती तिच्या चालण्याच्या शैलीमुळे आणि तिच्या रिलेशनशिपमुळे देखील ट्रोल झाली आहे. परंतु मलायका अशा गोष्टींकडे अजिबात लक्ष देत नाही. ती आपलं काम सुरु ठेवते.