मुंबई : मलायका अरोरा ही फॅशन आयकॉन म्हणून ओळखली जाते. अभिनेत्री तिच्या हटके फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते. मलायका अनेकदा फोटोशूट करण्यात व्यस्त असते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रत्येक वेळी ती पूर्वीपेक्षा जास्त ग्लॅमरस आणि सुंदर लूक करण्यासाठी विशेष मेहनत घेताना दिसते. नुकतीच मलायका आपल्या मुलाला भेटण्यासाठी न्यूयॉर्कला पोहोचली आहे. तिथे मलायकाने एक मनोरंजक व्हिडिओ शूट केला आहे.


'छैय्या छैय्या' गर्लचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने ट्रेंड होत आहे. या व्हिडिओमध्ये मलायका अरोरा कॅमेऱ्याकडे पाहून माझा प्रिन्स चार्मिंग कुठे आहे असा प्रश्न विचारत आहे. या प्रश्नाचं उत्तर अनेकांना माहित आहे. अनेकांनी अर्जुन नाव देखील घेतलं आहे.


मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर हे बी-टाऊनमधील सर्वात लोकप्रिय कपलपैकी एक आहेत. अर्जुन मलायकाने जेव्हापासून त्यांच्या नात्यावर शिक्कामोर्तब केला आहे, तेव्हापासून दोघेही सोशल मीडियावर रोमॅन्टिक फोटो शेअर करताना दिसतात.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


मलायका अरोराचा हा सुपर एंटरटेनिंग आणि क्यूट व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये मागून आवाज येतो की तुमचे केस खाली करा. हे ऐकून सोफ्यावर बसलेली मलायका तिचे केस नीट करते आणि मलायका कॅमेऱ्याकडे पाहून हसते आणि विचारते की माझा प्रिन्स चार्मिंग कुठे आहे.


मलायकाने हा प्रश्न विचारताच तिला अनेकांना कमेंटमध्ये वेगवेगळी उत्तर दिली आहेत.