मुंबई : बॉलिवूडची मुन्नी अर्थात अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या दमदार फिटनेसमुळे नेहमीच सगळ्यांचं लक्षवेधून घेत असते. त्यात तिच्या फिटनेस आऊटफिटची  ही वेळोवेळी चर्चा रंगताना दिसते. जीम लूकपासून ते योगा वेअर पर्यंत मलायकाच्या रोजच्या लूकवर जणू तिच्या चाहत्यांची नजर असते. पण कधी कधी हटके  आऊटफिट करण्याच्या नादात मलायकाला ट्रोल देखील केलं जातं..


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मलायका फिटनेस सेंटरमध्ये जाताना नेहमीच तिच्या मागे फोटोग्राफर्संची आणि चाहत्यांची गर्दी जमते. तिचे रोजचे लूक सोशल मीडियावर व्हायरल होताना पाहायला  मिळतात. त्यात सध्या मलायकाचा रिसेंट जीम लूक तिला काहीसा महागात पडलाये. मलायकाने जीममध्ये जाताना स्पोर्ट्स ब्रा आणि त्यावर जॅकेट घातलं होतं.



पण जीममधून बाहेर पडतानाचा मलायकाचं व्हिडिओ खूपच व्हायरल झाला..



 या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या कमेंट्स करायला सुरुवात केली.एका यूजरने कमेंट करत म्हटलं, "हीला कुणी तरी कपडे द्या" , दुसऱ्या यूजरने म्हटलं, "  मलायका नेहमीच अशा कपड्यांमध्ये दिसून येते, हिला कपडे देण्याची गरज आहे."




या आणि अशा कमेंट्समध्ये मलायका चांगलीच ट्रोल झाली. तर दुसरीकडे मलायका रोज जीममध्ये जाताना तिच्या मागे मोठी गर्दी दिसून येते. त्यामुळे रोडवर काही  वेळासाठी ट्राफिक देखील होते, ज्यासाठी तिथे उपस्थित असलेल्या पोलिसांना तेथील स्थिती मॅनेज करावी लागते. यावरुन देखील तिला बरं-वाईट सुनवण्यात आलं  आहे.