Malaika Arora and Arhaan Khan : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या कामासोबत खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. मलायका नुकतीच तिचा मुलगा अरहान खानच्या पॉडकास्ट 'डंब बिरयानी' मध्ये दिसली होती. अरहानच्या या पॉडकास्टमध्ये मलायकानं अरहानला असा प्रश्न विचारला ज्यानं सगळ्यांचे लक्ष वेधले. यावेळी मलायकानं अरहानला थेट त्याच्या व्हर्जिनिटीवर प्रश्न विचारला. हे पाहताच नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पॉडकास्टमध्ये मलायका आणि अरहान एक गेम खेळत असतात. यावेळी त्या दोघांनी एकमेकांना अनेक प्रश्न विचारले आणि जर ते त्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी अपयशी ठरले तर त्यांना मिर्चिचं कालवण खावं लागतं होतं किंवा हिरवी मिर्ची खावी लागत होती. या दरम्यान, मलायकानं तिच्या 22 वर्षांच्या मुलाला व्हर्जिनीटी कधी गमावली हा प्रश्न विचारला...  त्यानंतर तिनं आता बॉडी काऊंटवरुन प्रश्न विचारला त्यानंतर मलायकाला नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


मलायकानं अरहानला विचारला की तुझा बॉडी काउंट किती आहे? हा स्पायसी प्रश्न ऐकून अरहानला आश्चर्य झालं. तो म्हणाला, तुला माहित तरी आहे का याचा काय अर्थ आहे? त्यावर उत्तर देत मलायका म्हणाला मला याचं उत्तर दे, काऊंट सांग. मला आकडे ऐकायचे आहेत. अरहान मलायकाच्या या प्रश्नावर उत्तर देऊ शकला नाही. त्यानं मिर्चिचं कालवण खाणं पसंत केलं. दरम्यान, बॉडी काऊंटचा अर्थ असा आहे की ते लोक ज्यांच्यासोबत तुम्ही सेक्शुअली रिलेशनशिपमध्ये होतात. एपिसोड प्रदर्शित झाल्यानंतर मलायकाला तिच्या मुलाला असे प्रश्न विचारण्यावरुन ट्रोल करण्यात आलं आहे. नेटकऱ्यांनी तिच्या संस्कारांवर प्रश्न उपस्थित केला आहे. 


हेही वाचा : 'मुन्ना भाई एमबीबीएस' मध्ये सर्किट नाही तर अरशद वारसीच्या भूमिकेचं होतं 'हे नाव! ऐकताच पोट धरून हसाल


दरम्यान, याआधी मलायकानं अरहानला त्याच्या व्हर्जिनीटीवरुन प्रश्न विचारला होता. मलायकानं विचारलं की कोणत्या वयात त्यानं त्याची व्हर्जिनिटी गमावली... या प्रश्नावर देखील अरहाननं मलायकाला उत्तर दिलं आहे. तर अरहाननं मलायकाला तिच्या दुसऱ्या लग्नाविषयी विचारलं. अरहान म्हणाला की तू कधी लग्न करणार आहेस. मलायकाला विचारलं की ती तारिख, जागा आणि ती व्यक्ती ज्याच्याशी तू लग्न करणार आहेस ते सांग? हा प्रश्न ऐकूण मलायकाला आश्चर्य झालं आणि तिनं म्हटलं की सध्या मी या प्रश्नांची उत्तरं देऊ शकत नाही. तर मलायकानं उत्तर न देता मिर्ची खाणं पसंत केलं.