`हे लोक चाहत्यांना अस्पृश्य समजतात`, Malaika Arora वर नेटकरी संतापले
Malaika Arora चा तो व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. त्या व्हिडीओत मलायकानं तिच्या चाहत्यांना ज्या प्रकारे वागणूक दिली ते पाहूण नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केले आहे. मलायका विषयी बोलायचे झाले तर तिनं `अॅन अॅक्शन हीरो` या चित्रपटात पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती.
Malaika Arora Got Trolled For Treating Fans badly : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. मलायका ही चित्रपटसृष्टीत सक्रिय नाही. मात्र, तिचे आजही लाखो चाहते आहेत. मलायकाला आजही लोक 'छैय्या छैय्या' गर्ल म्हणून ओळखतात. मलायकासोबत फोटो काढण्यासाठी आजही लोक गर्दी करत असल्याचे आपण पाहतो. असाच काहीसा प्रकार मलायकासोबत पुन्हा एकदा घडला आहे. तिच्यासोबत फोटो काढण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केली. मात्र, असं काही झालं की मलायका संतापली. खरंतर काही चाहते मलायकासोबत सेल्फी काढण्यासाठी खूप जवळ आले होते. ते मलायकाला आवडले नाही आणि ती त्या लोकांवर संतापली. त्याचा एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Malaika Arora Viral Video)
मलायकाचा हा व्हिडीओ फिल्मी ग्यान या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत आपण पाहू शकतो की मलायका ही मुंबई विमानतळावर असल्याचे दिसते. तिला पाहताच क्षणी तिचे चाहते तिच्यासोबत फोटो काढण्यासाठी धावतात. हे पाहता मलायका थांबते. मात्र, अचानक एका चाहत्याचा मलायकाला धक्का लागतो. त्यावर उत्तर देत मलायका त्याला आरामात असं बोलते आणि रागात निघून जाते. पुढे मलायकासोबत एक महिला चाहती देखील फोटो काढण्याचा प्रयत्न करताना दिसते. ती मलायकाच्या थोडं जवळ येताच तिच्यावर देखील मलायका संतापते आणि तिथून निघून जाते. मलायकाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यावर त्यावर नेटकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा : मराठमोळ्या अभिनेत्रीला 'Sexy Video पाठव' असा मेसेज; स्क्रीनशॉर्ट शेअर करत म्हणाली, 'तुमची आई बहिण...'
मलायकाच्या या व्हायरल व्हिडीओवर कमेंट करत एक नेटकरी म्हणाला, अशा लोकांच्या जवळपण का जायचं, ज्यांनी चाहत्यांची थोडीपण काळजी नाही. दुसरा नेटकरी म्हणाला, लोक वेडे आहेत. फोटो क्लिक केल्यानं काय मिळणार आहे. तिसरा नेटकरी म्हणाला, अस्पृश्य लोकांसारखं ते चाहत्यांना वागवतात. आणखी एक नेटकरी म्हणाला, त्या मुलीसोबत तरी नीट फोटो काढला असता. दुसरा नेटकरी म्हणाला, जवळ जाऊन फोटो काढणाऱ्यांना खूप मारलं पाहिजे. जे लोक तुम्हाला नीट वागवत नाही त्यांना का इतका सन्मान द्यायचा. (Malaika Arora Trolled) मलायका अरोराच्या कामाविषयी बोलायचे झाले तर तिनं अभिनेता आयुषमान खुरानाच्या 'अॅन अॅक्शन हीरो' या चित्रपटात पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती.