मुंबई : मलायका अरोरा बॉयफ्रेंड अर्जुन कपूरला बऱ्याच दिवसांपासून डेट करत आहे. दोघांना अनेकदा पार्टी आणि इव्हेंटमध्ये एकत्र पाहिले जाते. जोडपे एकमेकांसोबत येण्याची एकही संधी सोडत नाहीत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चाहत्यांनाही आता दोघांना लग्न करताना बघायचे आहे. मात्र, दरम्यान, मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरमध्ये भांडण झाल्याची बातमी समोर येत आहे. त्यामुळे दोघेही ख्रिसमस आणि न्यू इयर एकत्र साजरे करणार नाहीत.


मलायका अरोराला बॉयफ्रेंड अर्जुन कपूरसोबत ख्रिसमस आणि न्यू इयर साजरे करायचे होते. मात्र चित्रपटगृहे सुरू झाल्यानंतर अर्जुन कपूर त्याच्या चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे, त्यामुळे त्याने ख्रिसमस आणि नवीन वर्ष एकत्र साजरे करण्यास नकार दिला आहे. अर्जुन कपूरच्या या निर्णयामुळे मलायका नाराज असल्याचे बोलले जात आहे.



अर्जुन कपूरने नुकतेच मोहित सूरीच्या रोमँटिक अ‍ॅक्शन थ्रिलर 'एक व्हिलन रिटर्न्स'चे शूटिंग पूर्ण केले. अर्जुन कपूर सध्या अनेक प्रोजेक्ट्सच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे, त्यामुळे तो यावेळी ख्रिसमस किंवा नवीन वर्ष साजरा करू शकणार नाही.



काही दिवसांपूर्वी अर्जुन कपूरने गर्लफ्रेंड मलायका अरोरासोबत दिवाळी पार्टी एन्जॉय केली होती. यावेळी तो पारंपारिक अवतारात दिसला. पण आता त्यांच्या व्यस्त शेड्युलमुळे अर्जुन कपूर आणि मलायका ख्रिसमस आणि नवीन वर्ष एकत्र साजरे करू शकणार नाहीत.



मलायकाने मे 2017 मध्ये पती अरबाज खानला घटस्फोट दिला. त्यानंतर तिचे अर्जुन कपूरसोबत अफेअर होते. मलायका-अर्जुन अनेकदा पार्ट्या आणि इव्हेंटमध्ये दिसत आहेत. मलायकाने अरबाज खानला 5 वर्षे डेट केल्यानंतर लग्न केले. मलायकाने लग्नाच्या 19 वर्षानंतर अरबाजला घटस्फोट दिला.