अंबानींचा शाही सोहळा सोडून; मलायका अरोरा नियॉन बिकीनीत `या` ठिकाणी एकटीच व्हॅकेशनवर
वयाच्या 50 व्या वर्षी मलायका अरोरा आपल्या परफेक्ट फिगरने लोकांना घायाळ करत आहे. आता ती आपला Me Time स्पेंड करताना दिसतेय.
बॉलिवूडमधील हॉट मॉडेल आणि अभिनेत्री मलायका अरोरा कायमच कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असते. कधी तिची फॅशन तर कधी तिचं खासगी आयुष्य. आता पुन्हा एकदा मलायका लाइमलाइटमध्ये आली आहे. मुंबई अंबानी कुटुंबातील धाकटा मुलगा अनंत अंबानी-राधिका मर्चंट यांचा शाही सोहळा पार पडत आहे. पण मलायका अरोरा मात्र स्पेनमध्ये एकटी व्हॅकेशनला गेली आहे.
अरबाज खानपासून वेगळे झाल्यानंतर मलायका अर्जुन कपूरसोबत होती. या दोघांनी अनेकदा आपलं प्रेम सोशल मीडियावर व्यक्त केलं आहे. एवढंच नव्हे तर मलायका आणि अर्जुन अनेकदा व्हॅकेशनला गेल्यावर फोटो देखील पोस्ट करताना दिसत होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात काही आलबेल नसल्याच्या बातम्या कानी पडत असताना, मलायकाच्या या व्हॅकेशनने ते खरं आहे की, काय असा प्रश्न चाहत्यांना पडत आहे.
अनंत अंबानींच्या लग्नात मलायका दिसली नव्हती. कारण सध्या ती स्पेनमध्ये व्हेकेशन एन्जॉय करत आहे. तिथून अभिनेत्रीने बिकिनीतील काही फोटो शेअर केले आहेत, जे पाहून तुम्ही तिच्या प्रेमात पडाल. निऑन कलरच्या बिकिनीमधला मलायकाचा हॉट लूक सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.
खास फॅशन
पहिल्या फोटोत मलायका अरोराने काळ्या आणि पांढऱ्या रंगाचा सनग्लासेस घालून बीचवर पोज दिली आहे. यावेळी मलायका अरोरा मोकळ्या केसांमध्ये आणि मेकअपशिवाय खूपच सुंदर दिसत आहे. तर, दुसऱ्या फोटोमध्ये मलायका अरोरा तिची कर्वी फिगर फ्लाँट करताना वाळवंटाचा आनंद घेताना दिसत आहे. हा फोटो शेअर करताना मलायकाने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'डेझर्ट सर्व्ह केले गेले आहे.' कधी खाण्यासोबत तर कधी सेल्फी घेताना मलायकाने सोशल मीडियावर काही ड्रॉप डेड गॉर्जियस फोटो शेअर केले आहेत.
चाहत्यांनी कौतुक केले
मलायकाचे फोटो पाहिल्यानंतर चाहते तिचे कौतुक करण्यापासून स्वतःला रोखू शकले नाहीत. अनेक कमेंट करुन चाहत्यांनी आपली प्रतिक्रिया दर्शवली आहे. मलायकाच्या या स्टोरीवर अनेक प्रतिक्रिया येत आहेत.