मुंबई : अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या अभिनय-नृत्यासोबतच तिच्या सौंदर्यामुळे सतत चर्चेत असते. मलायका अशा अभिनेत्रींपैकी एक आहे जी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तिच्या प्रोफेशनल लाईफसोबतच ती वैयक्तिक आयुष्यातील गोष्टींमुळेही ती खूप चर्चेत असते. नुकतीच मलायका अरोरा न्यूयॉर्कला रवाना झाली आहे.


मलायका अरोराने नुकतेच सोशल मीडियावर फोटो शेअर करून ती मुलाला भेटण्यासाठी साता समुद्रापार पोहोचल्याचं सांगितलं आहे. अरहान पुढे चालत असताना मलायकाने त्याचा एक फोटो क्लीक केला आहे.


मलायकाने आपल्या मुलाच्या मागे फिरताना दिसत आहे.हा फोटो तिने इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे.


मलायका मुंबई सोडून थेट न्यूयॉर्कमध्ये सध्या मुलासोबत राहत आहे. ती त्याच्यासोबत क्वॉलिटी टाईम स्पेंड करत आहे.



मलायका तिच्या मुलासोबत न्यूयॉर्कमध्ये वेळ घालवत आहे. अभिनेत्री मुलगा अरहान खानसोबत तेथील कला संग्रहालयाला भेट देण्यासाठी बाहेर पडली आहे.


मलायका अरोरा आणि अरबाज खान यांचा मुलगा अरहान खान आंतरराष्ट्रीय विद्यापीठात शिकत आहे. अरहान परदेशात शिक्षणासाठी गेला आहे.