Malaika Arora On Her Home Name Plate As Divorce : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora)  ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. मलायका ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. मलायका ही तिच्या फिटनेससाठी ओळखली जाते. मलायका ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते. सध्या मलायका तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. मलायकानं नुकतचं तिच्या शोमध्ये स्टॅंड अप कॉमेडी करून दाखवली आहे. यावेळी मलायका तिच्या एक्स म्हणजेच पूर्वाश्रमीचा पती अरबाज खान (Arbaaz Khan) आणि तिच्या घटस्फोटावर बोलली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मलायकानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून तिच्या शोमधील स्टॅंड अपचा हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत मलायका बोलते की 'आजही घटस्फोट हा लोकांसाठी मोठा शब्द आहे, आज स्त्रिया किती उंच भरारी घेतात, पण घटस्फोट झाला तर लोक सर्व काही विसरून त्यांना जज करतात. पुढे मलायका म्हणाली की तिला देखील बऱ्याचवेळा जज केलं आहे. मी बीझनेस करते, मी एक आई आहे, एक मुलगी आहे पण संपूर्ण जगासाठी मी घटस्फोटीत आहे. पुढे विनोद करत मलायका म्हणाली की, तिच्या घराबाहेर तिच्या नावाच्या नेमप्लेट ऐवजी घटस्फोटीत लिहायला हवं. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


मलायका स्टँड अप कॉमेडी करत बोलते, 'माझ्या एक्सनं मूव्ह ऑन केलं आहे आणि मीही माझ्या आयुष्यात पुढे गेली आहे. पण मग तुम्ही कधी आयुष्यात मुव्ह ऑन कराल. अशा प्रकारे हसत खेळत मलायकानं ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिलं आहे. (malaika arora new show moving in with malaika actress reply on divorce with arbaaz khan to trollers) 


हेही वाचा : Sai Pallavi च्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! अभिनेत्री लवकरच...


मलायका ही तिच्या आणि अर्जुन कपूरच्या (Arjun Kapoor) रिलेशनशिपमुळे सतत चर्चेत असते. मलायका आणि अर्जुनमध्ये असलेलं वयाचं अंतर हे अनेकांना आवडत नाही. त्यामुळे ते मलायकाला सोशल मीडियावर ट्रोल करताना दिसतात. मलायका आणि अरबाजला एक मुलगा असून तो परदेशात शिक्षण घेत आहे. त्यासोबत तो काका सलमान खानसोबत त्याच्या चित्रपटाच्या सेटवर जाणून दिग्दर्शनाचे धडे देखील घेत असल्याचे म्हटले जाते. (Malaika Arora And Arjun Kapoor Relationship)