Malaika Arora Oops Moment : बॉलिवूड दिवा मलायका अरोरा नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. अभिनेत्री आपल्या फॅशनसेन्स सोबतच फिटनेसमुळेही चाहत्यांच लक्ष केंद्रित करुन घेते. ४८ वर्षांची मलायका आपल्या ग्लॅमरस आणि बोल्ड लूकला घेवून सोशल  मीडियावर चर्चेत असते. फॅशनच्या नादात अभिनेत्री अनेकदा ऊप्स मोमेंटची शिकारही झाली आहे. मलायका नुकतीच करिना आणि अमृता अरोरासोबत स्पॉट झाली होती. अभिनेत्री आपल्या बेस्टफ्रेंडसोबत रेस्टॉरंटच्या बाहेर स्पॉट झाली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मलायका झाली ऊप्स मोमेंटची शिकार 
मलायका, बेबो आणि अमृताने कॅमेरासमोर बऱ्याच पोज दिल्या. बी-टाऊनच्या तिन्ही अभिनेत्रींनी भरपूर स्टाईलिश आणि ग्लॅमरस दिसत आहेत. यावेळीच मलायका अरोरा ऊप्स मोमेंटची शिकार झाली. मात्र या तिघांना लंच डेटनंतर रेस्टॉरंट बाहेर स्पॉट केलं गेलं. यावेळी बेबोने ब्लक कलरचं टी-शर्ट आणि डेनिम जीन्स घातली होती. मलायकाने डीपनेक टॉप आणि ब्लॅक पँन्ट घातली होती. मलायका या आऊटफिटमध्ये भरपूर स्टाईलिश दिसत होती. तिने पापाराझींना पोज दिल्या. तर अमृताने पिवळ्या रंगाचा ड्रेस निवडला.


 सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल 
पापाराझींना पोज दिल्यानंतर मलायका कारमध्ये बसली. या दरम्यान मलायका उप्स मोमेंटची शिकार झाली. मलायकाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर अनेक यूजर्स मलाइकाला ट्रोल करत आहेत. पापाराझींसाठी पोज देतानाही मलायका तिच्या ड्रेसबाबत थोडी जागरूक दिसत होती. यादरम्यान मलायका अनेक वेळा तिचा ड्रेस फिक्स करताना दिसली. तिच्या फॅशन सेन्समुळे ही अभिनेत्री अनेकदा ट्रोल झाली आहे.



अर्जून कपूरला करतेय डेट
अभिनेत्री या दिवसांत अर्जून कपूरला डेट करत आहे. दोघंही अनेकदा वेकेशनला जाताना दिसतात. सोशल मीडियावर या दोघांचे फोटो अनेकदा व्हायरलही होत असतात. नुकतंच मलायका आणि अर्जून एका पार्टीमध्ये दिसले होते. फँन्स दोघांना एकत्र पाहण्यासाठी आतुर असतात. अर्जूनसुद्धा आपल्या लेडीलव्हसोबत सोशल मीडियावर फोटो शेअर करत असतो. अर्जून या दिवसांत एक विलन रिटर्न्सच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.