मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री, डान्सर आणि फिटनेस आयकॉन मलायका अरोरा (Malaika Arora) सध्या रिऍलिटी शो 'सुपर डान्सर चॅप्टर 4' (Super Dancer Chapter 4) मध्ये परिक्षक म्हणून आहे. मलायका आता 47 वर्षांची असून 19 वर्षांचा मुलगा अरहान खान  (Arhaan Khan)ची आई आहे. पण पुन्हा एका मलायका आई होण्याचा विचार करतेय. याबाबतचा खुलासा तिने एका रिऍलिटी शोमध्ये केली आहे. 


मलायकाला व्हायचंय मुलीची आई 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मलायका अरोराने काही दिवसांपूर्वी सुपर डान्सरमध्ये शिल्पा शेट्टीला रिप्लेस केलं आहे. या शोमध्ये सहभागी झालेल्या मुलींना बघून मलायका खूप इम्प्रेस झाली. म्हणून तिची इच्छा आहे की, मला एक मुलगी असती. मात्र एक स्पर्धक अंशिका राजपूत (Anshika Rajput) चा डान्स पाहून मलायकाने मोठा खुलासा केला आहे. 


दुसऱ्यांदा आई होण्यास उत्सुक आहे मलायका 


मलायकाने अंशिकाचं कौतुक करताना बोलता बोलता मोठा खुलासा केला आहे. मलायकाला पुन्हा एकादा आई व्हायचं आहे. हा तिचा खूप सीरियस विचार आहे. मलयकाने सांगितलं की, मला एक मुलगी हवी. कारण तिच्या आजूबाजूला सगळे पुरूषच आहेत. ती एका मुलाची आई आहे. मात्र तिला मुलीची ओढ आहे. जिच्यासोबत ती आपलं मेकअप, शूज आणि कपडे शेअर करू शकते.


गीता कपूरने दिल्या शुभेच्छा 


मलायकाची इच्छा पूर्ण व्हावी अशी दुसरी परिक्षक गीता कपूरने इच्छा व्यक्त केली. ही इच्छा ऐकून गीता कपूर खूप भावूक झाली. तिने मलायकाला शुभेच्छा दिल्या आणि मलायकाला एक गोंडस मुलगी होऊ दे अशी इच्छा व्यक्त केली. मलायकाने यावर प्रतिक्रिया दिली की,'गीता तुमच्या तोंडात घी शक्कर. मला मुलगी होऊ दे किंवा मी मुलगी ऍडॉप्ट करेन. माझी ही खूप मनापासून इच्छा आहे.'