मुंबई : बॉलिवूडची फिटनेस क्वीन मलायका अरोराचे अनेक चाहते आहेत. मलायका सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह असते आणि तिचे सुंदर फोटो तिच्या चाहत्यांसोबत शेअर करत असते. मलायकाला आज कोविड लसीचा दुसरा डोस मिळाला आहे. याबद्दल तिने आपल्या इंस्टाग्राम हँडलवर पोस्ट शेअर करुनही याबद्दल माहिती दिली आहे. मलायकाचे फोटो सोशल मीडियावर येताच व्हायरल झाली आहेत. त्याचबरोबर ती ट्रोलिंगचा बळीही होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

असा होता मलायकाचा लूक 
मलायका अरोरा ही लस घेण्यासाठी आली असता तिने राखाडी रंगाची सपोर्ट ब्रा परिधान केली होती. तसंच तिने ट्रॅक पॅन्ट घातली होती. याबरोबर तिने खांद्यावर ट्रॅक जॅकेट घेतला होता. मलायकाची अशी लस घेणं चाहत्यांना आवडलेलं नाही यामुळे लोकांनी तिला कमेंटच्या माध्यमातून चांगलंच सुनावलं आहे. 



मलायका फ्रंटलाइन वॉरियर्सला म्हणाली धन्यवाद
फोटो पोस्ट करत मलायका अरोराने लिहिलं आहे की, 'म्हणून मी नेहमी म्हणते, आम्ही एकत्र आहोत. मी केवळ स्वत:ला सुरक्षित ठेवणार नाही, तर मी तुम्हाला सुद्धा सुरक्षित ठेवणार आहे. लसीचे दोन्ही डोस घेतले. घराच्या बाहेर सतत काम करत असलेल्या आघाडीच्या योद्धांचे आभार मानण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. या कार्यासाठी सर्वांचे आभार.'



लोकांनी अशा दिल्या प्रतिक्रिया 
ट्रोल होणाऱ्या मलायकालावर बर्‍याच लोकांनी कमेंन्ट केल्या आहेत. एकानं लिहिलं की, 'लस घ्यायला गेलो ​​कि जिममध्ये' तर एकानं लिहिलं आहे की, 'कदाचित आतमध्ये फोटोशूट आहे.' त्याचवेळी दुसर्‍या व्यक्तीने लिहिलं की, 'अशा प्रकारचे जॅकेट घालण्याचा काय उपयोग?' तर एका व्यक्तीने लिहीलंय की, मर्यादा ओलांडली. अशा प्रकारच्या कमेंन्ट मलायकावर केल्या जात आहेत.त्यामुळे मलायका सोशल मिडियावर चांगलीच ट्रोल होत आहे.