मुंबई : अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या प्रोफेशनल आणि खासगी आयुष्यामुळे कायम चर्तेत असते. आता देखील मलायका खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. रंगणाऱ्या चर्चेमागे कारण देखील तितकचं गंभीर आहे. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात एक असा प्रसंग असतो, जो आपण कधीचं विसरू शकत नाही. मलायकाने देखील अशा एका प्रसंगाचा सामना केला. आयुष्यातील 'त्या' एका प्रसंगाने  मलायकाच्या अंगावर आला काटा होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही दिवसांपूर्वी मलायकाचा अपघात झाला होता. अपघातानंतर कित्येक दिवस मलायका सोशल मीडियापासून दूर होती. पण आता मलायकाची प्रकृती स्थिर आहे. एका मुलाखतीत तिने अपघात झालेल्यानंतर आलेला अनुभव सांगितला आहे. 


मलायका म्हणाली, 'तो एक असा प्रसंग होता... जो मला आठवायचा देखील नाही. एक अशी गोष्ट जी मी कधी विसरू शकत नाही. शारीरिक रूपाने मी पूर्ण घाबरली होती.'


'मी आता जेव्हा सिनेमात एखादा अपघाताचा सीन आणि रक्त पाहाते, तेव्हा मला मोठा धक्का बसतो. जेव्हा अपघात झाला, तेव्हा मला माहितीही नव्हत की, मी जिवंत आहे... की माझं निधन झालं आहे... सर्वत्र फक्त रक्त होतं... मला मोठा आवाज आला... धक्का बसला आणि त्यानंतर सर्व काही अंधूक दिसू लागलं..'


अपघातानंतर जेव्हा मलायका रुग्णालयात दाखल करण्यात आलं, त्यानंतर अभिनेत्रीला शुद्ध आली. अपघातानंतर मलायका दोन दिवस रुग्णालयात होती. आता मलायाकाची प्रकृती स्थिर आहे. तिला रणबीर आणि आलियाच्या रिसेप्शन पार्टीमध्ये स्पॉट करण्यात आलं.