मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या हटके स्टाईलमुळे एंटरटेंन्मेंट इंडस्ट्रीत चर्चेत असते. मलायकाचं प्रोफेशनल आणि वैयक्तिक आयुष्य दोन्हीही आरशासारखी चाहत्यांसमोर आहे. अरबाज खानबरोबर घटस्फोट असो किंवा अर्जुन कपूरला डेट करणं असो, मलायका माध्यमांमधील प्रत्येक विषयावर खुलेपणाने बोलते. आता पुन्हा एकदा मलायकाने एक इच्छा व्यक्त केली आहे, ज्यामुळे ती सर्वत्र चर्चेत आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आई होण्याची मलायकाची ईच्छा
नुकतीच मलायकाने 'सुपर डान्सर4' या रिअॅलिटी शोमध्ये एक इच्छा व्यक्त केली आहे. मलायका या शोमध्ये जजच्या भूमिकेत दिसली आहे. शोच्या स्टेजवर मलायकाने आपल्याला आई बनण्याची इच्छा व्यक्त केली आहे. जर हे करता येत नसेल तर तिला मुलगी दत्तक घ्यायची आहे. मलायका म्हणाली की, तिला नेहमीच एका मुलीची आई व्हायची ईच्छा आहे.


मलायका अरोरा 47 वर्षांची आहे. अरबाज खानपासून घटस्फोट घेतल्यानंतर ती अर्जुन कपूरला बर्‍याच दिवसांपासून डेट करत आहे. सुपर डान्सरच्या स्टेजवरील स्पर्धक अंशिका राजपूतच्या डान्सने मलायकाला इतके प्रभावित केलं की, तिने सांगितलं की, तिलाही मुलगी हवी आहे. मलायका म्हणाली की, आता ती गंभीरपणे आई होण्याचा विचार करीत आहे. ती असंही म्हणाली की, तिला तिच्या आयुष्यात मुलगीची आवश्यकता आहे, कारण तिच्या आजुबाजूला सगळीच मुलं आहेत. ती एका मुलाची आई आहे, मात्र आता तिला एक मुलगी हवी आहे जिच्यासोबत ती तिचा मेकअप, शूज आणि कपडे शेअर करू शकेल.


मलायकाचं हे वक्तव्य ऐकुन गीता कपूरसुद्धा उत्साहित झाल्या. गीता यांनी मलायकाला शुभेच्छा दिल्या आणि म्हणाल्या की मलायकाला एक गोड मुलगी असावी. यावर प्रतिक्रिया देताना मलायका म्हणाली, 'गीता- तुझ्या तोंडात तूप-साखर पडू देत. मला एक मुलगी हवी आहे किंवा मी एक मुलगी दत्तक घेऊ शकते. ही माझी इच्छा आहे.'