Malaika Arora Birthday: आपल्या अभिनयानं आणि ग्लॅमरनं प्रेक्षकांना कायम घायाळ करणाऱ्या मलायका अरोराचा (Malaika Arora Birthday) आज वाढदिवस आहे. आपल्या गर्लफ्रेंडच्या वाढदिवसानिमित्तानं अर्जून कपूरनंही (Arjun Kapoor Post) खास पोस्ट शेअर केली आहे. बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा आज तिचा 50 वा वाढदिवस साजरा करत आहे. मलायकाचा आजही तितकीच हॉट आणि लोकप्रिय आहे. सगळ्या अभिनेत्रींमध्ये मलायका अरोरा सर्वात टॉप अभिनेत्री आहे. मलायका आपल्या पर्सनल लाईफसाठी आणि फिटनेससाठी (Fitness) कायमच चर्चेत असते. सध्या मलायका अर्जून कपूर सोबतच्या रिलेशनशिपमुळे (Relationship) अधिक चर्चेत आहे. (Malaika Arora Reveals How Chaiyya Chaiyya Shoot Left Her Bruised And Bleeding entertainment news marathi)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मलायका अरोराने 1998 मध्ये आलेल्या 'दिल से' (Dil se) चित्रपटातील एका गाण्यावर डान्स केला होता आजही हा डान्स सगळ्यांच्याच लक्षात असेल. ते गाणं होतं चल छय्या छय्या.. (Chal Chayya Chayya) हे गाणं त्या काळी खूप लोकप्रिय झालं होतं. या गाण्यावर मलायकानं डान्स केला आहे. हे अनेकांना माहितीही नव्हते. त्या काळातच मलायकानं डान्सर म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. 


हेही वाचा - तो किस्सा सांगताना अभिनेता सिद्धार्थ जाधवच्या डोळ्यात आलं पाणी, आवंढा गिळत म्हणाला...


मलायका अरोराने या गाण्याच्या शूटिंगदरम्यान अनेक हाल सोसले आहे. मुळात हे अख्खं गाणं ट्रेनवर शूट केलं आहे. जे करणं अजिबात सोप्पं नव्हतं. मलायकासाठीही नव्हतं. ट्रेनवर अशाप्रकारे सलग डान्स करणं हे मलायकासाठीही सोप्पं नव्हतं. एका मुलाखतीत तिने सांगितले होते की ट्रेन चालू होती आणि ती अनेक वेळा वरून पडली होती. वाऱ्यामुळे तिचा अनेकदा तोलही गेला होता.


मलायका अरोरा चालत्या ट्रेनमधून पडू नये आणि काही झालंच तर योग्य काळजी घेता यावी म्हणून टीमने तिच्या कमरेला दोरी आणि घागरा बांधला होता. चालत्या ट्रेनमध्ये हवेच्या दाबामुळे आणि सतत इकडे तिकडे डोलत असल्याने तिच्या कमरेतून रक्तस्त्रावही होत होता. मलायकाने दोरी काढल्यावर तिला अनेक जखमा (Malaika Arora Bruised) झाल्याचे समोर आले. 


हेही वाचा - 'मी कोणाला पैसे...', लोकप्रिय अभिनेत्रीनं आपल्या बॉलिवूड एन्ट्रीबद्दल केला धक्कादायक खुलासा


मलायका अरोरा आज वयाच्या 50 व्या वर्षीही सुपर फिट आहे. या वयातही ती जिम, योगा करून शारीरिक तंदुरुस्ती (Malaika Arora Fitness) राखते. मलायका अरोरा अनेक दिवसांपासून अभिनेता अर्जुन कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. दोघेही दररोज सोशल मीडियावर एकत्र फोटोज शेअर करत असतात.