Malaika Arora चा `हा` बोल्ड व्हिडीओ पाहिलात का? होतोय व्हायरल
Malaika Arora चा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. तिच्या या व्हिडीओनं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे.
Malaika Arora's Bold Video : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. मलायका ही चित्रपटसृष्टीत सक्रिय नसली तरी देखील ती चर्चेचा विषयी ठरते. मलायका ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. मलायकानं नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. (Malaika Arora Bold Video)
मलायकानं हा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओत मलायका ग्लॅमरस लूकमध्ये दिसत आहे. मलायकानं कॅमेऱ्यासमोर योगा ड्रेस परिधान केल्याचे दिसत आहे. मलायका यावेळी एक फोटोशूट करत आहे. त्यावेळी तिनं दिलेल्या मादक अंदानी चाहते घायळ झाले आहेत. मलायकानं हा व्हिडीओ Tropic like it’s hot! असे कॅप्शन दिलं आहे. या व्हिडीओत मलायका केसांशी खेळताना दिसत आहे. मलायकाचा हा हॉट आणि बोल्ड लूक सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. (Malaika Arora Glamours Look)
या आधी मलायकाचा एक पांढऱ्या रंगाच्या बॉडी कॉन ड्रेसमधला व्हिडीओ व्हायरल झाला होता. या वेळी मलायका खूप सुंदर दिसत होती. त्याचे काही फोटो देखील मलायकानं सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिच्या फोटोंवर कमेंट करत सुंदरकतेचं रूप, अशी कॉमेन्ट केली आहे. तर दुसऱ्यांनी तू खूप हॉट दिसतेस असं म्हटलं आहे. (Malaika Arora in White Dress)
हेही वाचा : Swara Bhaskar Marriage: 'पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त', रजिस्टर मॅरेजनंतर स्वरा भास्करनं का केला असा इशारा
दरम्यान, व्हॅलेंटाईन डे च्या निमित्तानं मलायकाचा बॉयफ्रेंड (Malaika Arora's Boyfriend Arjun Kapoor) अर्जुनने (Arjun Kapoor) त्याचा आणि मलायकाचा एक फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला होता. या फोटोत मलायका एका हातात ज्युसचा ग्लास घेऊन उभी असलेली दिसत आहे. अर्जुन ने तिला पाठीमागून मिठी मारल्याचं दिसत आहे. हा फोटो शेअर करत अर्जुननं लाल रंगाचं हार्ट इमोटिकॉन वापरले आहे.
अर्जुन आणि मलायका गेली अनेक वर्ष एकमेकांना डेट करत आहेत. ते अनेक कार्यक्रमांना पार्ट्यांना एकत्र हजेरी लावतात. त्याचप्रमाणे सोशल मीडियावर ही सक्रिय राहून ते एकमेकांबद्दलचं प्रेम व्यक्त करत असतात.