मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या फिटनेस आणि तिच्या ग्लॅमरस फोटोंमुळे नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते. पण यावेळी तिची चर्चा जरा वेगळ्या कारणासाठी आहे. सोशल मीडियावर सक्रिय असलेली मलायका नुकतीच फुलं चोरताना दिसली. आपण केलेली चोरी स्वीकारत, मलायकाने तिच्या इंस्टाग्रामवर चोरलेल्या फुलांसोबत एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत. तिनं सुंदर फूलं चोरलं असल्याचं सांगितलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मलायकाचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. मलायकाचे चाहते देखील हा फोटो लाईक करुन शेअर करत आहेत. त्याचबरोबर बॉलिवूड स्टार्सही मलायकाच्या पोस्टवरील कमेंट्स करताना दिसत आहेत.



ट्विंकल खन्नाने मलायकाच्या पोस्टवर प्रतिक्रिया
मलायकाने शेअर केलेल्या फोटोवर ट्विंकलने इमोजीसह "फूल चोर.......वसंत येथे आहे'' असं कमेंन्टमधेये लिहिलं आहे. या फोटोमध्ये मलायकाने मास्क लावला आहे.तसंच राखाडी स्लीव्हलेस टी-शर्ट, ब्लॅक शॉर्टमध्ये ती दिसत दिसत आहे. एका हातात कात्री घेऊन तर, दुसर्‍या हातात फुलांची फांदी मलायकाने घेतली आहे


फोटोत मलायकाच्या मागे गुलाबी रंगाची बरीच फुले दिसत आहेत. मलायकाचा हा फोटो पाहून अक्षय कुमारची पत्नी अभिनेत्री ट्विक्ल खन्ना यांनी रेड हार्ट इमोजी पाठवत कमेंट केली आहे. त्याचबरोबर सोशल मीडिया फॅन्स मलायकाला 'फूल चोर' अशा कमेंन्ट करीत आहेत. तर एका नेटकऱ्याने मलायकाचा हा फोटो बघून लिहिले आहे की, माझ्या हृदयाचे तुकडे तुकडे झाले आहेत.


मलायका बर्‍याचदा इंस्टाग्रामवर तिचे फोटो शेअर करते. अलीकडेच अभिनेत्रीने तिचा हॉट व्हिडिओ आणि फोटो शेअर केला होता जो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. फोटोमध्ये ती बॅक साइड लूकमध्ये काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसली होती. तसंच शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये मलायका जिममध्ये हॉट पॅन्ट्स आणि क्रॉप टॉपमध्ये डान्स करताना दिसली होती.