मुंबई : बॉलिवूडची सुपर बोल्ड अभिनेत्री मलायका अरोरा हिला यावेळी बॉयफ्रेंड अर्जुन कपूरशिवाय नवीन वर्ष सेलिब्रेट करावं लागत आहे. अर्जुन कपूर नुकताच कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे त्याने स्वतःला क्वारंटाईन केलं आहे. अशा परिस्थितीत नवीन वर्षाच्या निमीत्ताने मलायका अर्जुनला भेटू शकली नाही. दरम्यान, मलायकाने तिचा एक बेडरूम व्हिडिओ शेअर केला आहे. जो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मलायकाने शेअर केला बेडरूम व्हिडिओ  
या व्हिडिओमध्ये मलायका अरोरा बेडवर झोपून एक्सप्रेशन देताना दिसत आहे. तिने स्वतः हा व्हिडिओ इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. जो चाहत्यांना खूप आवडतोय. व्हिडिओ शेअर करत  मलायकाने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, गुड मॉर्निंग 2022. कमेंट सेक्शनमध्ये चाहते तिला नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत आहेत.


मलायका अरोरा अर्जुनला मिस करत आहे
एक दिवसापूर्वी मलायका अरोराने बॉयफ्रेंड अर्जुन कपूरसोबतचा स्वतःचा एक फोटो पोस्ट केला होता, जो सोशल मीडियावर चर्चेत आहे. तिने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, 'मी तुला खूप मिस करत आहे 'मिस्टर पाउटी'


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


(पण माझा पाऊट तुझ्यापेक्षा चांगला आहे). नवीन वर्षाच्या शुभेच्छा.' यासोबतच तिने हार्ट इमोजीही शेअर केला आहे. फोटोमध्ये मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर थिरकताना दिसत आहेत. खरंतर, हा फोटो अर्जुन कपूर आणि मलायकाच्या मालदीव व्हेकेशन वेळचा आहे, जिथे दोघांनी एकमेकांसोबत खूप चांगला वेळ घालवला होता.