Thanksgiving day 2020: मलायकाने मानले अर्जुनचे आभार
Thanksgiving dayचं औचित्य साधत मलायकाने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला.
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. ती नेहमी तिच्या अकाउंटवर फोटो आणि व्हिडिओ टाकत चाहत्यांच्या संपर्कात असते. आज देखील Thanksgiving dayचं औचित्य साधत मलायकाने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला. तिचा हा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मलायकाने पोस्ट केलेल्या फोटोमध्ये सर्वप्रथम अभिनेता अर्जुन कपूरचा फोटो दिसत आहे. अर्जुननंतर तिने कुटुंबाचे आणि मित्र परिवाराचे आभार मानले आहेत. Thanksgiving day बद्दल तिने कॅप्शन देखील लिहिलं आहे.
व्हिडिओ शेअर करत तिने सर्वांचे आभार मानले आहेत. ती म्हणते, 'यंदाचे वर्ष ज्यांच्यामुळे खास ठरलं त्यांचे आभार... सध्या Thanksgiving dayची जगात सर्वांना अत्यंत गरज आहे. प्रेम, आभार आणि कृतज्ञता हे आयुष्यातील अविभाज्य घटक आहेत. ' असं तिने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.
शिवाय यंदाच्या वर्षी संपूर्ण जगाला अनेक संकटांचा सामना करावा लागला. पण या संकटाच्या काळात अनेक नवे अनुभव आले त्यासाठी अशा क्षणांचे कायम आभार मानायला हवे असं देखील ती म्हणाली.
विशेष म्हणजे आभार प्रदर्शनाच्या दिवशी तिने डॉक्टर, पोलीस, नर्स आणि अत्यावश्यक सेवेतील सर्वांचे आभार मानले आहे. त्याचप्रमाणे तिने शेतकऱ्याचे देखील आभार मानले आहेत. ज्याच्यामुळे आपल्याला टेबलावर अन्न मिळतं अशा जगाच्या पोशिंद्याचे देखील आभार मानायला मलायका विसरली नाही.