मुंबई : मलायका अरोराचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत अभिनेत्री ब्लॅक कलरच्या फिश शेप ड्रेसमध्ये एका कार्यक्रमात पोहोचली होती. हा ड्रेस परिधान करून अभिनेत्री रेड कार्पेटवर पापाराझींसमोर पोज देत होती. त्यानंतर अभिनेत्रीने असं काही बोलली की, ते ऐकून अर्जुन कपूरचाही हार्टब्रेक होवू शकतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ब्लॅक ड्रेसमध्ये कहर
या व्हिडिओमध्ये मलायका अरोराने काळ्या रंगाचा गाऊन परिधान केला आहे. गाऊन फिश कट शेपचा आहे. मलायका या ड्रेसमध्ये खूपच सुंदर आणि ग्लॅमरस दिसत आहे. लुकबद्दल बोलायचं झालं तर, अभिनेत्रीने स्मोकी आय मेकअप केला आहे. एक घट्ट पोनी आणि गळ्यात नेकलेस घातला आहे.


मलायका अरोरा या ड्रेसमध्ये खूपच हॉट दिसत आहे. हा सुपर क्लासी ड्रेस परिधान करून, मलायका रेड कार्पेटवर फोटोसाठी पोझ देत होती. तेवढ्यात मलायकाकडे अचानक एक लहान मूलगा येतो. या मुलाने मलायकाला मॅचिंग ब्लॅक कलरचा कोट आणि पँट घातलेली दिसतेय. या मुलाला पाहताच अभिनेत्रीने त्याला शेकहॅण्ड करते. यानंतर मलायकाने या मुलाला विचारते, 'तू आज रात्री माझ्यासोबत डेटवर येशील का?' हे ऐकून तो लहान मूलगा हसू लागतो. भलेही हे मलायकाने त्याला मजेशीरपणे सांगितलं असेल, पण अभिनेत्रीचं हे बोलणं ऐकून अर्जुन कपूरचं मात्र हृदय नक्कीच तुटू शकतं.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


मलायका मुलावर प्रेमाचा वर्षाव करताना दिसली
यानंतर मलायका मुलाच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवते आणि आजूबाजूच्या लोकांना विचारते की हा मूलगा कोणाचा आहे. तो हरवला आहे का?