मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा चित्रपटात झळकली नसली तरी तिच्या बोल्ड लुकमुळे नेहमीच ती चर्चेत असते. आताही अशाच एका शोमध्ये ट्रान्सपरंट ड्रेस घालून मलायका अरोरा पोहोचली आहे. या शोमधील तिचे फोटो आता समोर आले आहेत.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मलायका अरोरा जेव्हा जेव्हा एखाद्या अवॉर्ड फंक्शनला किंवा कार्यक्रमाला जाते, तेव्हा तेव्हा ती सर्व लाइमलाइट तिच्याकडे खेचून घेते. या घटनेतही तसंच झाले आहे. मुंबईत लेट नाईट मिस इंडिया कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. ज्यामध्ये मलायका अरोराही बोल्ड ड्रेसमध्ये पोहोचली होती. या कार्यक्रमासाठी मलायका अरोरा ट्रान्सपरंट ड्रेस परिधान करून कॅमेऱ्यासमोर येताच तिला पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले होते. 


लुकची एकचं चर्चा  


मलायका लाइट बदामी कलरचा सिक्वेन्स वर्क गाऊन घालून पोहोचली होती. अभिनेत्रीचा हा पोशाख तळापासून इतका लांब होता की अनेक लोक तिचा हा ड्रेस सावरण्यासाठी मदतीसाठी पुढे आले होते. मलायकाच्या या ड्रेसचा गळा इतका खालपर्यत आहे की त्यामुळे तिचा ड्रेस मर्यादेपेक्षा अधिक बोल्ड दिसत आहे. तसेच तिचा हा ट्रान्सपरंट ड्रेस आहे. या तिच्या लुकवर चाहते घायाळ झाले आहेत.