ब्रेकअपच्या चर्चेनंतर मलायकाचं बोल्ड फोटोशूट व्हायरल
मलायकाने आज ज्याप्रकारे स्वत:ला फिट ठेवलं आहे. ते पाहून ती 48 वर्षांची आहे यावर कोणाचाही विश्वास बसणार नाही.
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आणि डान्सिंग क्वीन मलायका अरोरा हिला तिच्या अभिनयाच्या जोरावर फारशी प्रसिद्धी मिळाली नसेल. पण तिच्या डान्सिंग आणि स्टायलिश स्टाइलचं चाहते आज जगभरात आहेत. मलायकाने आज ज्याप्रकारे स्वत:ला फिट ठेवलं आहे. ते पाहून ती 48 वर्षांची आहे यावर कोणाचाही विश्वास बसणार नाही. आजकाल अभिनेत्रीचं वैयक्तिक आयुष्यादेखील खूप चर्चेत असतं.
मलायकाने पुन्हा एकदा बोल्ड फोटोशूट केलं
अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपच्या बातम्यांदरम्यान मलायकाने पुन्हा एकदा बोल्ड फोटोशूट केले आहे. अभिनेत्रीने नुकतंच तिच्या इंस्टाग्राम पेजवर काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती खूपच ग्लॅमरस दिसत आहे. मलायका हिरव्या रंगाच्या शॉर्ट ड्रेसमध्ये दिसत असल्याचं फोटोंमध्ये दिसत आहे. या लूकमधील तिची स्टाइल आणि एटिट्यूड पाहण्यासारखा आहे. या फोटोनी लोकांना वेड लावलं आहे.
या सोबतच अभिनेत्रीने हाय हिल्स आणि न्यूड मेकअपसोबत तिचा लूक पूर्ण केला आहे. अभिनेत्रीच्या हेअरस्टाईलबद्दल बोलायचं झालं तर मलाइकाने हाय पोनीटेल बनवली आहे. मलायकाने तिचं हे फोटोशूट 3 वेगवेगळ्या पोस्टमध्ये शेअर केलं आहे, जिथे प्रत्येक फोटोमध्ये तिची वेगळी स्टाईल पाहायला मिळत आहे. तिची टोन्ड बॉडी पाहून चाहते तिचं कौतुक करत आहेत.