मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. मलायका ही चित्रपटांमध्ये सक्रिय नसली तरी तिचे लाखो चाहते आहेत. मलायका ही बॉलिवूडची एक स्टाइलिंग दिवा आहे. मलायका नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. दरम्यान, मलायकाचा एक जुना फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. पण यावेळी सगळ्यांचे लक्ष हे मलायकाच्या हिल्सनं वेधले आहे. (Malaika Arora Viral Photi) 


मलायका अरोराच्या ड्रेस आणि हिल्सची किंमत 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मलायकानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा फोटो शेअर केला आहे. (Malaika Arora Instagram) मलायकानं हिरव्या रंगाच्या शेडचा ड्रेस परिधान केला आहे. या ड्रेसमध्ये मलायका सुंदर दिसते. मात्र, सोशल मीडियावर चर्चा तिच्या हिल्सची सुरु आहे. (Malaika Arora Heels) मीडिया रिपोर्ट्नुसार, मलायकानं या फोटोमध्ये जी हिल्स परिधान केली आहे त्या हिल्सची किंमत ही सुमारे 83 हजार आहे. जर फक्त हिल्सची किंमत हजारोंमध्ये असताना मलायकाच्या या सुंदर ड्रेसची किंमत किती असेल याची कल्पना करा. मीडिया रिपोर्ट्सनुसार या ड्रेसची किंमत 2 लाख 40 हजार रुपये असल्याचे म्हटले आहे. (Malaika Arora Dress and Heels Price)



दरम्यान, काही दिवसांपूर्वी मलायका आणि अर्जुन हे लग्न बंधनात अडकणार या गोष्टीमुळे चर्चेत आली होती. (Malaika And Arjun Relatinship) मलायका ही वयानं 12 वर्षे लहान असलेल्या अर्जुनसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. मलायकानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून तिचा एक फोटो शेअर केला होता. ज्यामध्ये मलायकानं काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता. हा फोटो शेअर करत मलायकानं कॅप्शनमध्ये लोकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. तिनं कॅप्शनमध्ये लिहिलं की 'I Said Yes.' अभिनेत्रीच्या पोस्टवरून नेटकऱ्यांना वाटलं की, 'अर्जुन कपूरला लग्नासाठी हो म्हटलं आहे. मग काय, सेलेब्सपासून चाहत्यांपर्यंत सगळेच तिचं अभिनंदन करू लागले. मात्र, प्रत्यक्षात तसं काही नाहीये. (Malaika And Arjun Marriage Rumours) 


हेही वाचा : Sushant Singh Rajput ची मॅनेजर दिशा सालियनचा मृत्यूचं कारण अखेर समोर


मलायकानं त्यानंतर सर्व अफवा फेटाळून लावल्या आहेत. शेअर केलेल्या पोस्ट मागचं खरं कारणही सांगितलं आहे. तिनं अर्जुनला लग्नासाठी 'हो' म्हटलं नाही, तर डिस्ने प्लस हॉटस्टारवर येणाऱ्या तिच्या रिएलिटी शोसाठी ती हो म्हणाली आहे. मलायकाचा रिअॅलिटी शो 'मुव्हिंग विथ मलायका' OTT वर प्रदर्शित होणार आहे. हा शो 5 डिसेंबर 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे.