मुंबई : मलायका अरोरा तिच्या फिटनेससाठी बॉलिवूडमध्ये ओळखली जाते. अभिनेत्रीचा जिम लूक अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होतो आणि काहीवेळा ती असे पोशाख परिधान करते ज्यामुळे ती चर्चेचा विषय बनते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काहीवेळा तिने परिधान केलेले हे कपडे इतके बोल्ड असतात की, ती ऊप्स मोमेंटची बळी देखील बनते आणि हे एका इव्हेंटमध्ये देखील घडलं आहे.  जेथे मलायका वन शोल्डर गाउन घालून आली आणि तिला पाहिलेले सर्व लोकं फक्त बघतच राहिले. मलायका या गाऊनमध्ये अप्रतिम दिसत होती पण या गाऊनमध्ये ती ऊप्स मोमेंटची शिकार झाली.


मलाइकाचा ऊप्स मोमेंट
मलायकाने एका कार्यक्रमादरम्यान पिवळ्या रंगाचा सुंदर ड्रेस परिधान केला होता पण या कार्यक्रमात तिच्यासोबत असं काही घडलं ज्याची तिने कल्पनाही केली नसेल. खरं तर हा सगळा प्रकार 2020 च्या मिस दिवा युनिव्हर्स ग्रँड फिनालेमध्ये घडला आहे. कार्यक्रमादरम्यान, मलायकाने तिचा लूक पूर्ण करण्यासाठी गोल्डन स्ट्रॅपी हिल्ससह फ्लोअर-स्वीपिंग वन-शोल्डर रफल्ड गाऊन घातला होता. मलायकाच्या सौंदर्याने सर्वांचं लक्ष तिने वेधून घेतलं होतं.


लोकांनी ट्रोल केलं
पण या सुंदर लूकसह तिने रेड कार्पेटवर पाऊल ठेवताच ती ऊप्स मोमेंटची शिकार झाली. या क्षणाचे फोटोही कॅमेऱ्यात कैद झाले, त्यानंतर हे फोटो इंटरनेटवर व्हायरल झाले. लोकांना तिचा हा लूक खूप आवडला आहे.  पण काही लोकं तिला ट्रोलही करत आहेत.