मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा हिला अलिकडेच मुलगा अरहानसोबत बांद्र्यात स्पॉट करण्यात आले. पण नेहमी कॅमेरा पाहुन पोज देणारी मलायका अरोरा यावेळेस मात्र कॅमेऱ्यापासून चेहरा लपवताना दिसली. नेमकी कुठे गेली होती मलायका? सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मलायका आपल्या मुलासह एक्स हजबॅंड अरबाजला भेटायला गॅलक्सी अपार्टमेंटमध्ये गेली होती.


यामुळे झाले विभक्त


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयपीएल सामन्यांवर सट्टा लावल्याप्रकरणी अभिनेता अरबाज खान दोषी आढळल्यानंतर मलायका मुलासह त्याला भेटायला थेट त्याच्या घरी गेली होती. मलायका आणि अरबाज खानने ५ वर्ष डेटिंग केल्यानंतर १९९८ मध्ये लग्न केले. मात्र लग्नाच्या २० वर्षांनंतर दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. २०१७ मध्ये विभक्त झालेल्या या जोडप्याच्या घटस्फोटाचे कारण नेमके कळले नव्हते. मात्र आता ते उघड झाले आहे. अरबाज खानची सट्टेबाजी आणि ३ वर्षात ३ कोटी रुपये हारणे, हे यांच्या वेगळे होण्याचे कारण होते. 


अरबाजने दिली कबुली


पोलीसांनी ४ तास केलेल्या चौकशीत अरबाजने हे स्वतः कबूल केले की, मलायका आणि त्याच्या वेगळे होण्याचे कारण सट्टेबाजी होते. अरबाजचे सट्टेबाजीचे व्यसन आणि पैसे हारल्यानंतर ते वसूल करण्यासाठी वारंवार येणारे फोन्स यामुळे त्रासून मलायकाने वेगळे होण्याचा निर्णय घेतला. 


आयपीएल सामन्यांवर सट्टा लावल्याप्रकरणी अभिनेता अरबाज खान दोषी आढळला. त्यानंतर त्याला माफीचा साक्षीदार करण्यात आल्यामुळे आता त्याला अटक होणार नाही. ठाणे गुन्हे अनवेशण विभागाच्या कार्यालयात झालेल्या चौकशीत त्याने सट्टा लावल्याची कबुली दिली आहे. यात २.७५ कोटी रुपये हरल्याचंही तो म्हणालाय.. आयपीएल मॅचेसवर आत्तापर्यंत सहा वेळा सट्टा लावल्याची कबुली आरबाज खान याने दिली आहे.