मल्याळम चित्रपटांचे सुपरस्टार मोहनलाल यांच्या चाहत्यांसाठी धक्कादायक बातमी आहे.. याचं कारण म्हणजे अभिनेत्याची तब्येत ठीक बिघडली असून त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केलं आहे. मोहनलाल यांना कोची येथील अमृता इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 64 वर्षीय मोहनलाल यांच्या ढासळत्या प्रकृतीची माहिती समजल्यानंतर त्यांचे हजारो चाहते चिंताग्रस्त झाले. सोशल मीडियावर ते लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा देऊ लागले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मोहनलाल नुकतेच गुजरातहून परतले आहेत. मोहनलाल आगामी चित्रपटाचे शूटिंग करत होता. तसेच दिग्दर्शक पदार्पणाच्या 'बॅरोज' चित्रपटाचे पोस्ट प्रॉडक्शनचे कामही पूर्ण केले आहे. दिग्दर्शक म्हणून मोहनलाल या त्यांच्या पहिल्या चित्रपटाबद्दल चाहते खूप उत्सुक होते, परंतु दरम्यानच्या काळात मोहनलाल यांची तब्बेत बिघडल्याने एकच चिंता व्यक्त केली जात आहे. 


सुपरस्टार मोहनलाल यांना काय झाले?



अमृता इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स हॉस्पिटलने अधिकृत निवेदन जारी केले आहे. जिथे मोहनलाल यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले. अभिनेत्याला व्हायरल इन्फेक्शन झाले असून त्यांना मायल्जियाचा त्रास असल्याचे सांगण्यात येत आहे. या कारणामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


मोहनलाल यांच्या तब्येतीवर काय म्हणाले डॉक्टर?


मोहनलाल यांना डॉक्टरांनी विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. मोहनलाल यांना संसर्ग आणि तापाचा त्रास होत आहे. मोहनलाल यांना रुग्णालयाकडून 5 दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. एवढंच नव्हे तर मोहनलाल यांना गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, असेही सांगण्यात आले आहे.


आगामी चित्रपट


मोहनलाल यांच्या आगामी चित्रपटाबद्दल बोलायचे तर तो 2019 मध्ये प्रदर्शित झालेल्या लुसिफरच्या सिक्वेलची तयारी करत आहे. ज्याचे दिग्दर्शन पृथ्वीराज सुकुमारन करत आहेत. हा चित्रपट मार्च 2025 मध्ये प्रदर्शित होणार आहे. ज्यामध्ये टोविनो थॉमस आणि शक्ती कपूरसारखे स्टार्सही असतील. याशिवाय अभिनय आणि निर्मात्यानंतर मोहनलाल दिग्दर्शक म्हणूनही आपली इनिंग सुरू करणार आहेत.



दिग्दर्शक डेब्यू सिनेमा 


मोहनलाल यांचा बॅरोज चित्रपट याच वर्षी प्रदर्शित होणार आहे. ज्यांचे पोस्ट प्रॉडक्शनचे काम सुरू आहे. 3 ऑक्टोबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकतो, असे बोलले जात आहे. यात गुरु सोमसुंदरम आणि कोमल शर्मा यांच्याही भूमिका आहेत. जे एक काल्पनिक नाटक आहे.