मुंबई : मल्लिका शेरावत बॉलिवूडच्या बोल्ड अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. तिची स्टाईल कोणालाही तिच्याबद्दल वेडं बनवू शकते. जरी ती चित्रपट जगतात फारशी सक्रिय नसली तरी सोशल मीडियावर तिची उपस्थिती कायम असते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मल्लिकाचा सनबाथ
मल्लिका शेरावत दररोज तिचे सुंदर आणि हॉट फोटो शेअर करत राहते. मल्लिकाने नुकतंच इंस्टाग्रामवर असे फोटो शेअर केले आहे, ज्याने सोशल मीडियाला आग लावली आहे. हे फोटो जुने आहेत पण मल्लिकाच्या स्टाईलमुळे हे जुने फोटो व्हायरल झाले आहेत. या फोटोमध्ये मल्लिका सनबाथ घेताना दिसत आहे.


चिल करताना दिसली मल्लिका
मल्लिका शेरावतने तिचा हा फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. तिचा बोल्ड आणि हॉट अवतार या फोटोमध्ये पाहायला मिळतो. फोटोमध्ये, ती पूलच्या साईडला ती चिल करताना दिसत आहे. फोटोमध्ये, तिने पांढरा बॉटम वेअर परिधान केला आहे आणि बॉडीला निळ्या रंगाच्या कापडाने झाकलेलं आहे.


पॅरिसमध्ये फिरतेय मल्लिका
अभिनेत्री सध्या पॅरिसमध्ये सुट्टी एन्जॉय करताना दिसत आहे. मल्लिका तिथून तिचे फोटो आणि व्हिडिओ तिच्या चाहत्यांसोबत सतत शेअर करत असते. कधी ती फ्रेंच इमारतीवर सर्पिल जिना चढताना दिसते तर कधी ती पॅरिसच्या रस्त्यांवर फिरताना दिसते. आता ती पूलच्या कडेला आरामशीर सनबाथ घेताना दिसत आहे. चाहत्यांना मल्लिका शेरावतचा हा फोटो खूप आवडला आहे.



मल्लिकाचं काम
मल्लिका शेरावतने 2003 मध्ये इम्रान हाश्मीसोबत 'मर्डर' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. ज्यात तिचा इम्रान हाश्मीसोबतचा किसिंग सीन खूप चर्चेत होता. एका मुलाखतीत तिच्या चित्रपटाबद्दल बोलताना मल्लिका शेरावत म्हणाली की, 'मर्डर' चित्रपटानंतर तिला चांगलं काम मिळणं बंद झालं होतं. मल्लिकाने बॉलिवूडबरोबरच हॉलिवूडमध्येही काम केलं आहे. मल्लिकाचे खरं नाव रीमा लांबा आहे.