नवी दिल्ली : बॉलीवूड अभिनेत्री मल्लिका शेरावत सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते. तिच्या फोटोजमूळे नेहमी चर्चेत असते. यावेळी मल्लिका वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे. 


परराष्ट्र मंत्र्यांनाच साकडे



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'मानवी तस्करी आणि लैंगिक शोषणा'वर काम करणाऱ्या संस्थेच्या बाजूने ती उभी राहिली आहे. 'फ्रि अ गर्ल' असे या संस्थेचे नाव असून मल्लिकाने या संस्थेसाठी थेट परराष्ट्र मंत्र्यांनाच साकडे घातले आहे. या संस्थेच्या सहसंस्थापकांना व्हिसा देण्यासाठी तिने सुषमा स्वराज यांना ट्विट केलंय. 


काय लिहलयं ट्विटमध्ये ?


 'मॅडम, डच एनजीओ 'फ्रि अ गर्ल' च्या संस्थापकाचा व्हिसा नाकारला जातोय. ही संस्था मानवी तस्करी आणि लैंगिक शोषणा'वर खूप चांगले काम करतेयं. त्यांच्या सुरक्षेसाठी काम करतेय. प्लीज यांना मदत करा.'


मीडिया रिपोर्टनुसार, मल्लिका स्वत: 'स्कूल ऑफ जस्टिस प्रोग्राम'ची ब्रॅण्ड अॅम्बेसिटर आहे. हा प्रोग्रामदेखील 'फ्री अ गर्ल' संस्थेतर्फे आयोजित करण्यात येतो.


अद्याप सुषमा स्वराज यांनी या ट्विट ला उत्तर दिले नाही. 


मल्लिकाविषयी...


मल्लिका शेरावत 'वेलकम', 'मर्डर', 'शादी के साइट इफेक्ट्स'सारख्या सिनेमांसाठी ओळखली जाते. २०१६ ला 'टाइम रियार्ड्स' सिनेमात ती दिसली होती.


कलर्स टीव्ही प्रोग्राम 'एंटरटेन्मेंट की रात'मध्ये ती दिसली. तिला घर खाली करण्यास सांगितले गेल्याच्या बातम्या काही दिवसांपूर्वी आल्या होत्या.


पण या वृत्ताचे तिने खंडन केले आणि तिचा पॅरिसला कोणता फ्लॅट नसल्याचे तिने सांगितले.