मुंबई : अभिनेत्री मल्लिका शेरावत फार काळापासून मोठ्या पडद्यापासून लांब आहे. मल्लिका लवकरच एका वेब सीरिजच्या माध्यमातून पुनरागमन करणार आहे. मल्लिकाने स्वत:च्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन वेब सीरिजच्या शूटिंगचे फोटो पोस्ट केले आहेत. या वेब सीरिजमध्ये मल्लिका अणि अभिनेता तुषार कपूर एकत्र झळकणार आहेत. वेब सीरिज हॉरर-विनोदी कथेवर आधारलेली आहे. वेब सीरिजसाठी मल्लिका विशेष मेहनत घेत आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 


मल्लिकाच्या वेब सीरिजच्या कथेत काही मित्रांचा समावेश आहे. मित्रमंडळी फिरत एका रिकाम्या हॉटेलमध्ये पोहचतात अणि काही वेळानंतर हॉटेलमध्ये अशा गोष्टी घडतात की मित्रही गोंधळून जातात. या हॉरर विनोदी वेब सीरिजमध्ये मल्लिका भूताची भूमिका साकारताना दिसणार असून वेब सीरिजचे दिग्दर्शन फरहाद सामजी करणार आहेत. मल्लिकाची भूताची भूमिका प्रेक्षकाच्या पसंतीस उतरणार की नाही हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे.


हरियाणाच्या हिसार येथे जन्म घेतलेल्या मल्लिका शेरावतचे खरे नाव रीमा लाम्बा असे आहे. 2003 साली आलेल्या 'ख्वाहिश' सिनेमाच्या माध्यमातून मल्लिकाने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता.