Young Poo in K3G Engagement Photos: हल्ली सेलिब्रेटी हे विवाहबंधनात अडकताना दिसत आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर ही त्यांचीच चर्चा रंगलेली असते. सध्या अशाच एका लोकप्रिय अभिनेत्रीची चर्चा आहे. 'कभी खुशी कभी गम' या 2001 साली आलेल्या हिंदी चित्रपटाची आजही तरूणाईमध्ये क्रेझ आहे. इतकी वर्षे झाली तरी हा चित्रपट आजही चाहते हे पुन्हा पुन्हा पाहताना दिसतात. 2021 मध्ये या चित्रपटाला 20 वर्षे पुर्ण झाली होती. त्यानिमित्तानं बॉलिवूड सेलिब्रेटींनीही या चित्रपटाच्या 20 वर्षपुर्तीनिमित्त सेलिब्रेशन केले होते. सोबतच त्यावेळी आलियाचा एक व्हिडीओही चांगलाच व्हायरल झाला होता. या चित्रपटातील करीना कपूरचा एक सीन तिन रिक्रिएट केला होता. करीना म्हणजे चित्रपटातील पूजा ही कॉलेजमधील तिच्या मित्रांना प्रोममध्ये जाण्यासाठी निमंत्रित करते तेव्हा ती कोणासोबत जाणार हे ठरवण्यासाठी या मुलांची पारख करते. तो तिचा सीन आलियानं आपल्या शैलीत शेअर केला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

परंतु तुम्हाला करीना कपूरची तरूणपणातील भुमिका करणारी अभिनेत्री मालविका राज आठवते आहे का? या लहानश्या पूजानं आपला नुकताच साखरपुडा उरकला असून त्याचे फोटो तिनं सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यावेळी तिनं चक्क तुर्कीमध्ये आपला हे रोमॅण्टिक फोटो शेअर केला आहे. यावेळी तिनं सुंदर असा पांढऱ्या रंगाचा गाऊन परिधान केलेला आहे आणि सोबतच ती अक्षरक्ष: एका परीकथेतील राजकुमारी प्रमाणे दिसते आहे. त्यामुळे तिची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. सोशल मीडियावर तिचे हे फोटो चांगलेच व्हायरल झालेले आहेत. बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रेटींनी तिच्या या फोटोंवर कौतुकाचा वर्षाव केलेला आहे. 


हेही वाचा - एकाच दिवशी धडकणार OMG 2 - Gadar 2; पण Advance Booking मध्ये कोणी मारली बाजी? पाहा


पूजा ब्रदा, अश्विनी यार्दी, माहिमा चावला, निखिल थप्पी, काव्या थापर, आहना कुमरा, प्रग्या जैसवाल, विक्रम फडणीस, प्रतीक बब्बर, तनीषा मुखर्जी, सुरज पांचोळी, साईशा शिंदे अशा काही सेलिब्रेटींनी यावेळी तिच्या पोस्टवर कौतुकाचा वर्षाव केेलेला आहे. 'कभी खुशी कभी गम' या चित्रपटात करीना कपूर ही हृतिक रोशनची बायको असते. त्यामुळे हृतिक आणि करीनाचा लहानपणीचा रोल करणारे दोघंही बालकलाकार आज मोठे झाले आहेत. त्यांच्या क्यूटनेसनं तेव्हा प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली होती. 



मालविका राज ही अभिनेत्री अनिता राज बॉबी राज यांची मुलगी आहे. तर प्रणव बग्गा हा एक मोठा उद्योगपती असून तो त्याच फॅमिली बॅकराऊंडमधून आलेला आहे.