चालत्या कारमध्ये अभिनेत्रीवर बलात्कार, आता नवा ट्विस्ट, मुख्यमंत्र्यांना यात ओढलं...
मला न्याय हवाय..
मुंबई : 2017 मधील एका बातमीने साऊथ फिल्म इंडस्ट्रीला धक्का बसला. एका सुप्रसिद्ध मल्याळी अभिनेत्रीवर चालत्या कारमध्ये बलात्कार करण्यात आला. धक्कदायक बाब म्हणजे बलात्कार करणाऱ्यांनी त्याचा व्हिडिओही बनवला.
ही बातमी समोर आल्यानंतर अनेक स्टार्सनी या कृत्याला विरोध केला. महिलांच्या सुरक्षेबाबत मोठमोठ्या गोष्टी सांगितल्या होत्या. पण आता या प्रकरणात एक नवीन अपडेट आले आहे.
मल्याळम स्टारला करण्यात आली होती अटक
साऊथ इंडियन सिनेमातील अभिनेत्रीवर चालत्या कारमध्ये बलात्कार करण्यात आला होता. महत्वाची बाब म्हणजे हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद करण्यात आला. ही घटना 18 फेब्रुवारी 2017 रोजी कोच्चीत घडली.
धक्कादायक बाब म्हणजे या घटनेमागी एक कट होता. मल्याळम सुपर स्टार दिलीप यांचा हा कट होता. या आधारावर त्यांना 2017 साली अटक करण्यात आलं. या प्रकरणावर आजही सुनावणी विशेष न्यायालयात सुरू आहे.
प्रकरणाला नवं वळण
आता या प्रकरणाला नवा ट्विस्ट आला आहे. अलीकडेच, अभिनेता दिलीपचा जुना मित्र आणि सिने दिग्दर्शकाने मीडियावर काही धक्कादायक गोष्टी सांगितल्या. या खुलाशाच्या आधारे, पीडितेने पुन्हा चौकशीसाठी पोलिस आणि मुख्यमंत्र्यांकडे देखील संपर्क साधला. आता दिलीपही तक्रार घेऊन मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचला आहे. सरकारी पक्ष आपल्या विरोधात षडयंत्र रचत असल्याचे त्यांचे मत आहे.
काय आहे प्रकरण
17 फेब्रुवारी 2017 रोजी अपहरण आणि बलात्कार प्रकरण उघडकीस आले. पोलिसात दाखल केलेल्या तक्रारीनुसार, अभिनेत्री शूटिंग सेटवरून परतत असताना तिचे अपहरण करून कारमध्ये तिच्यावर बलात्कार करण्यात आला. काही लोक अभिनेत्रीच्या कारचा पाठलाग करत तिच्या कारला धडकले. टक्कर झाल्यानंतर अभिनेत्रीच्या ड्रायव्हरने कार थांबवली आणि कारमध्ये काय झाले ते पाहू लागला. दरम्यान, अभिनेत्रीच्या कारच्या मागून आलेल्या कारमधून काही लोक खाली उतरले आणि त्यांनी तिला जबरदस्तीने आपल्या कारमध्ये बसवून ही घटना घडवून आणली.