मुंबई : दक्षिण इंडस्ट्रीतील सुप्रसिद्ध अभिनेता श्रीनाथ भासी याला सोमवारी केरळमधील कोची येथे महिला अँकरसोबत (Female anchor) गैरवर्तन केल्याप्रकरणी अटक करण्यात आली. पण त्याची आता जामिनावर सुटका झाली आहे. पण श्रीनाथ भासीची (Srinath Bhasi) सुटका झाली असली तरी हे प्रकरण अद्यापही वादाच्या भोवऱ्यात आहे. महिला पत्रकाराशी (female journalist) गैरवर्तन करणाऱ्या श्रीनाथ भासीला एका प्रसिद्ध अभिनेत्याचा पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे हे प्रकरण पुन्हा वादाच्या भोवऱ्यात अडकलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नुकताचं, Kerala Film Producers Association (KFPA) ने एक निवेदन जारी केलं होतं. ज्यामध्ये त्यांनी एका मुलाखतीदरम्यान महिला अँकरला शिवीगाळ केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या श्रीनाथ भासीला पाठिंबा देणार नसल्याचं जाहीर केलं. KFPA च्या घोषणेला बॅनचं स्वरुप देण्यात आलं. 


प्रसिद्ध अभिनेत्याचा श्रीनाथ भासीला पाठिंबा
एका रिपोर्टनुसार, प्रसिद्ध मल्याळम अभिनेता ममूटीने (Actor Mammootty) श्रीनाथ भासीला पाठिंबा दिला आहे. आगामी सिनेमा 'रोर्शच'च्या प्रमोशन दरम्यान ममूटी म्हणाला, ' कोणावरही बंदी घातली जावू शकत नाही. कोणाची उपजीविका का नाकारायची? ' एवढंच नाही तर, श्रीनाथवर आता कोणतीही बंदी नसल्याचा दावाही ममूटी केला. (Mammootty supports to Srinath Bhasi)



श्रीनाथ भासीला 26 सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली होती
एका महिला पत्रकाराच्या तक्रारीच्या आधारे गेल्या महिन्यात 26 सप्टेंबर रोजी मल्याळम अभिनेता श्रीनाथ भासीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. पीडितेच्या म्हणण्यानुसार, अभिनेत्याने त्याच्या नवीन सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान एका मुलाखतीत अँकर आणि क्रू सदस्यांविरुद्ध अपमानास्पद शब्द वापरले होते. तसेच शिवीगाळ देखील केली होती. (Promotion of the movie)